आधी वडिलांचं निधन, 16 दिवसांनी आईलाही गमावलं; ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच लेखिका नमिता वर्तक यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या घटनेच्या 16 दिवसांनंतर त्यांनी आईलाही गमावलं. मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रेक्षकांसाठी प्रत्येक एपिसोड रंजक कसा लिहावा यासाठी झटणाऱ्या […]

आधी वडिलांचं निधन, 16 दिवसांनी आईलाही गमावलं; 'आई कुठे काय करते'च्या लेखिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर
Milind GawaliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 1:49 PM

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच लेखिका नमिता वर्तक यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या घटनेच्या 16 दिवसांनंतर त्यांनी आईलाही गमावलं. मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रेक्षकांसाठी प्रत्येक एपिसोड रंजक कसा लिहावा यासाठी झटणाऱ्या लेखिकेच्या खासगी आयुष्यात किती दु:ख आहे, याविषयी ते व्यक्त झाले. पडद्यामागचं हे दु:ख प्रेक्षकांसमोर कधी येत नाही, असंही ते म्हणाले.

मिलिंग गवळी यांची पोस्ट-

‘पडद्यामागील दृश्ये- खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये. जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत. आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवढंच आपल्याला दिसत असतं, खूपशा गोष्टी पडद्यामागे असतात आणि खूप काही between the lines ही असतं, जे कधीच नाही दिसत. या सिनेमा, नाटक, सीरिअल या क्षेत्रामध्ये तर सगळंच पडद्यामागनंच असतं. सीरिअलचा 23-24 मिनिटांच्या एपिसोडसाठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरंच काही करत असतात. पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही तो लेखक. जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो. आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे तारखा उपलब्ध नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे. मग परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो’, असं त्यांनी लिहिलं.

हे सुद्धा वाचा

‘बरं लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो. पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल, उलथापालथ होत असेल तर? आई कुठे काय करतेच्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते. त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यातसुद्धा नमिताने ‘आई कुठे काय करते’चे एपिसोड लिहून दिले. 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काका गेले. त्या दुःखात सुद्धा ‘आई कुठे काय करते’चे एपिसोड नमिताने लिहून देत होती. काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली. नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. आभाळाएवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे पडद्यामागचं जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

मिलिंद यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत लेखिका नमिता वर्तक यांच्यासाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. आई कुठे काय करते ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमी अग्रस्थानी असते. यामध्ये मिलिंद गवळी, मधुराणी गोखले प्रभुलकर, रुपाली भोसले, ओमकार गोवर्धन यांच्या भूमिका आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.