Aakash Thosar | खळखळत्या धबधब्याखाली आकाश याची स्टंटबाजी; अभिनेत्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल

आकाश ठोसर याची सह्याद्रीमध्ये स्टंटबाजी; थरारक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, 'जय शिवराय....', अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

Aakash Thosar | खळखळत्या धबधब्याखाली आकाश याची स्टंटबाजी; अभिनेत्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 1:14 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फक्त आणि फक्त त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. सह्याद्री भटकंतीसाठी निघालेल्या आकाश याने खळखळत्या धबधब्याखाली स्टंटबाजी करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आकाश याने धबधब्याखाली रॅपलिंक करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘जय शिवराय…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आकाशच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

एवढंच नाही तर रॅपलिंक करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी याबद्दल देखील अभिनेत्याने चाहत्यांना सांगितलं आहे. पोस्टमध्ये अभिनेता म्हणाला, ‘गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे.एखाद्या डोंगर सुळक्यावर Trekking, Climbing किंवा Rappelling करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा Rope, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली Climbing किंवा Rappelling करावं.’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

पुढे अभिनेता म्हणाला, ‘सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे… कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्टची चर्चा रंगली आहे.

आता आकाश ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती रवी जाधव यांनी दिली आहे. आता चाहते देखील आकाश याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘सौराट’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या आकाश याने ‘झुंड’, ‘एफयू’, ‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

आकाश सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याची चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आकाश याच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतो. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकाश कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.