मुलीखातर पूर्व पत्नी रिना दत्तासोबत कार्यक्रमात पोहोचला आमिर खान, पहा व्हिडीओ
अभिनेता आमिर खानने सध्या चित्रपटांपासून ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आमिर नुकत्याच एका कार्यक्रमात त्याची पूर्व पत्नी रिना दत्तासोबत पोहोचला. यावेळी त्याची मुलगी आयरा खानसुद्धा सोबत होती.
मुंबई : 10 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणाक आहेत. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्याची लाडकी लेक आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती लग्न करणार आहे. लग्नाच्या तयारीतून काही वेळ काढत आयराने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात आयराचाही सन्मान करण्यात आला. या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत होणारा पती नुपूरसुद्धा उपस्थित होता. इतकंच नव्हे आपल्या मुलीची साथ देण्यासाठी आमिर खानसुद्धा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला. मात्र यावेळी आमिर एकटाच नव्हता, तर त्याच्यासोबत पूर्व पत्नी रिना दत्तासुद्धा होती. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आमिर, रिना आणि आयरा एकत्र खूप खुश दिसले.
18 नोव्हेंबर रोजी नुपूरने आयरासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याला जवळचा मित्रपरिवारच उपस्थित होता. या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयरा खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आयराने विविध मुलाखतींमध्ये तिच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला होता. एका मुलाखतीत ती पालकांसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली होती. “माझे आईवडील नेहमीच माझ्या कठीण काळात सोबत होते, पण त्यांच्यासमोर मोकळेपणे बोलणं कठीण होतं”, असं आयरा म्हणाली होती. 26 वर्षीय आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे.
View this post on Instagram
आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना ही आमिरची शेजारी होती असं म्हटलं जातं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले. आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.
View this post on Instagram
विविध मुलाखतींमध्ये आमिरने रिनासोबतच्या घटस्फोटाबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. 2002 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर रिनाने मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद यांचं पालकत्व घेतलं. कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये आमिर म्हणाला होता, “रिना आणि मी 16 वर्षे सोबत होतो. जेव्हा आम्ही विभक्त झालो, तेव्हा तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रिना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही.”