त्या निर्णयानंतर मानसिकदृष्ट्या खचला आमिर खान; टोकाच्या भूमिकेवरून मुलानेही सुनावलं

अभिनेता आमिर खानने त्याच्या कुटुंबीयांना वेळ देता यावा यासाठी करिअरमधील सर्वांत मोठा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी जेव्हा त्याने कुटुंबीयांना सांगितलं, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला, याविषयी आमिरने सांगितलं आहे.

त्या निर्णयानंतर मानसिकदृष्ट्या खचला आमिर खान; टोकाच्या भूमिकेवरून मुलानेही सुनावलं
Aamir KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 1:18 PM

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम केल्यानंतर, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ची ओळख मिळवल्यानंतर अभिनेता आमिर खानने अभिनयक्षेत्र सोडण्याच निर्णय घेतला. करिअरवर लक्ष केंद्रीत करताना कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता आलं नाही, अशी तक्रार आमिरने व्यक्त केली. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट मुलाखतीत आमिर चित्रपट सोडण्याच्या त्याच्या निर्णयावर मोकळेपणे व्यक्त झाला. या निर्णयामुळे पूर्व पत्नी किरण रावला खूप मोठा धक्का बसल्याचंही त्याने सांगितलं. मात्र तिच्याचमुळे आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाल्याची कबुली आमिरने दिली. या मुलाखतीत आमिर त्याच्या आयुष्यातील अत्यंत नकारात्मक काळाविषयीही व्यक्त झाला. मानसिकरित्या पूर्णपणे खचल्याने थेरपीचाही आधार घेतल्याचं त्याने सांगितलं.

कुटुंबीयांसाठी घेतला मोठा निर्णय

“तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या मुलांना सांगितलं की मी चित्रपटात काम करणं सोडतोय, तेव्हा त्यांचा सवाल होता की, पप्पा तुम्ही चित्रपटसृष्टी कसं सोडू शकता? गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही वेड्यासारखे या इंडस्ट्रीत काम करत होता. कदाचित तुम्ही भावनिक होऊन आता हा निर्णय घेत असाल पण तुम्ही पुढे ते सहन करू शकणार नाही. पण जेव्हा मी माझ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मुख्य समभागधारकांची बैठक बोलावली, तेव्हा त्यांना माझ्या निर्णयाचं गांभीर्य समजलं. त्या बैठकीला किरणसुद्धा उपस्थित होती. माझी कंपनी ताब्यात घेऊन चांगल्या चित्रपटांची निर्मिती करा, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण कोणीच ती कंपनी स्वीकारण्यास तयार नव्हतं”, असं आमिर म्हणाला.

पूर्व पत्नी किरण रावने काढली समजूत

आमिरचा हा निर्णय ऐकून किरणसोबतच इतरही अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. याविषयी आमिरने पुढे सांगितलं, “तू आम्हाला सर्वांना सोडतोय”, असं किरण भावूक होत म्हणाली. तेव्हा मी तिला समजावलं की मला कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे, म्हणून मी फिल्म इंडस्ट्री सोडतोय. त्यावर किरण म्हणाली, नाही.. तुला आता ही गोष्ट समजत नाहीये. तू चित्रपटांसाठीच बनला आहेस. जर तू फिल्म इंडस्ट्री सोडत असशील तर याचा अर्थ तू तुझं आयुष्य आणि हे जगसुद्धा सोडून जातोय. त्या जगाचा आम्हीसुद्धा एक भाग आहोत आणि तू आम्हालाही सोडून जातोय. माझा मुलगा जुनैदनेही मला काही गोष्टी समजावून सांगितल्या. तो म्हणाला, पापा.. तुम्ही एखाद्या लोलकासारखे (पेंड्युलम) आहात. जेव्हा तुम्ही चित्रपट करत होता, तेव्हा तुम्ही त्या लोलकाच्या एका बाजूला होता आणि आता जेव्हा तुम्हाला कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे, तेव्हासुद्धा तुम्ही त्या लोलकाच्या दुसऱ्या बाजूला आहात. तुम्ही फार टोकाचे निर्णय घेता आणि आतासुद्धा तुम्ही तेच करत आहात.”

हे सुद्धा वाचा

मानसिकदृष्ट्या खचला होता आमिर

या संपूर्ण घटनेदरम्यान मानसिकदृष्ट्या खचून गेल्याची कबुली आमिरने या मुलाखतीत दिली. “या सर्व गोष्टींमुळे मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. मानसिकरित्या मला खूप वेदना जाणवल्या होत्या. मी तणावात होतो. माझी मुलं जेव्हा लहान होती, जेव्हा आयरा 3, 8, 12 वर्षांची होती.. तेव्हा मी तिच्यासोबत कधीच नव्हतो. कधीकधी मी त्यांच्यासोबत किंवा माझ्या आईसोबत वेळ घालवायतो, पण मानसिकरित्या मी तिथे कधीच उपस्थित नसायचो. माझ्या डोक्यात सतत काम आणि कामाचेच विचार असायचे. या जाणीवेमुळे मी अधिक तणावात गेलो. अखेर यातून बाहेर पडण्यासाठी मला थेरपीचा आधार घ्यावा लागला”, असं त्याने स्पष्ट केलं.

लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.