Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा डान्स; पहा Video

आमिर खानचा 'पापा कहते है' गाण्यावर डान्स; मुलगी आयरा खानच्या साखरपुड्याचा जल्लोष

Aamir Khan: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा डान्स; पहा Video
लेकीच्या साखरपुड्यात आमिरचा डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 10:17 AM

मुंबई- अभिनेता आमिर खानच्या कुटुंबात सध्या आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कारण त्याची लाडकी लेक आयरा खान हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत आयरा लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. एका खासगी समारंभात या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावेळी काही सेलिब्रिटी, जवळचा मित्रपरिवार आणि काही कुटुंबीय उपस्थित होते. या साखरपुड्यातील एका व्हिडीओने खास नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत आमिर खान अत्यंत आनंदात नाचताना दिसतोय.

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पापा कहते है’ हे आमिरचं गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे. लेकीच्या साखरपुड्यात आमिरने याच गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

आयराच्या साखरपुड्याला आमिरच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींनी हजेरी लावली होती. किरण रावने नुपूरसोबत बरेच फोटो काढले. यावेळी तिच्यासोबत मुलगासुद्धा उपस्थित होता. तर आमिरची पहिली पत्नी रीना दत्तानेही साखरपुड्याला हजेरी लावली होती. याशिवाय अभिनेत्री फातिमा सना शेखसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती. मध्यंतरीच्या काळात आमिर आणि फातिमा यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. फातिमा आणि आयरा या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

57 वर्षीय आमिरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. वाढलेल्या पांढऱ्या दाढी-मिशीतील त्याचा हा वेगळा लूक पाहून अनेकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केला.

कोण आहे आमिरचा होणारा जावई?

आयरा आणि नुपूर हे 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या आणि नुपूरच्या नात्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.