आमिर खानच्या लेकीचं केळवण; पंगतीत दिसली सावत्र आई

आमिर खानची लेक आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती लग्नगाठ बांधण्यास सज्ज झाली आहे. जानेवारी महिन्यात हा लग्नसोहळा पार पडणार असून त्यापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आयरा आणि नुपूरचं केळवण नुकतंच पार पडलं.

आमिर खानच्या लेकीचं केळवण; पंगतीत दिसली सावत्र आई
केळवणाला आमिर खानची पूर्व पत्नीही उपस्थितImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 2:08 PM

मुंबई : 27 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. कारण त्याची मुलगी आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात आयरा लग्न करणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्याची झलक तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दाखवली आहे. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. तर नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. मंगळवारपासून आयराच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून त्याला अभिनेत्री मिथिला पालकरनेही हजेरी लावली होती.

आयरा आणि नुपूरचं लग्न महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार पार पडणार असल्याचं कळतंय. त्यानुसार लग्नापूर्वी केळवण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी नुपूर आणि आयराच्या कुटुंबीयांसाठी खास जेवण होतं. या केळवणला आमिरची दुसरी पत्नी आणि आयराची सावत्र आई किरण रावसुद्धा उपस्थित होती. किरणसोबत तिचा मुलगा आझादसुद्धा केळवणासाठी आला होता. केळवणसाठी आयराने लाल रंगाची साडी नेसली होती. तर नुपूरने कुर्ता-पायजमा परिधान केला होता. या दोघांचा साधा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमिरने मुलीच्या लग्नाची तारीख सांगितली होती. “आयराचं लग्न 3 जानेवारीला होणार आहे. तिने जो मुलगा निवडला आहे, तो फिटनेस ट्रेनर आहे आणि तो खूप चांगला आहे. आम्ही त्याला पोपोय नावाने हाक मारतो.”, असं तो म्हणाला.

18 नोव्हेंबर रोजी नुपूरने आयरासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याला जवळचा मित्रपरिवारच उपस्थित होता. या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयरा खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आयराने विविध मुलाखतींमध्ये तिच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला होता. एका मुलाखतीत ती पालकांसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली होती. “माझे आईवडील नेहमीच माझ्या कठीण काळात सोबत होते, पण त्यांच्यासमोर मोकळेपणे बोलणं कठीण होतं”, असं आयरा म्हणाली होती.

आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले. आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.