Aamir Khan च्या घरी वाजणार सनई-चौघडे, मराठमोळ्या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्याची लेक

Aamir Khan : आयरा खान हिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात... मराठमोळ्या लूकमध्ये आमिर खान याची लेक दिसते प्रचंड सुंदर... सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान हिची चर्चा, लवकरच अडकणार विवाहबंधनात

Aamir Khan च्या घरी वाजणार सनई-चौघडे, मराठमोळ्या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्याची लेक
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 10:33 AM

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : अभिनेता आमिर खान याच्या लेकीचं लवकरच लग्न होणार आहे. आमिर याची लेक आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करणार आहे. आयरा आणि नुपूर यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. नुकताच आयराचं केळवण पार पडले आहे. आयरानं केळवणाच्या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. मराठमोळ्या लूकमध्ये आयरा खान प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा आणि नुपूर यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. आयरा कायम होणाऱ्या पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

आता चाहते देखील आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. आयरा आणि नुपूर यांचं लग्न हिंदू पद्धतीत होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. अभिनेता आमिर खान देखील लेकीच्या लग्नासाठी उत्सुक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघे त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव देण्यासाठी सज्ज झालं आहे.

कधी होणार आयरा – नुपूर यांचं लग्न

आयरा – नुपूर यांचं लग्न जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयरा – नुपूर 3 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर उदयपूर याठिकाणी दोघांचं शाही थाटात लग्न होणार आहे. एवढंच नाही तर, लग्नानंतर आमिर याने मुंबईत रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 13 जानेवारी रोजी मुंबईमध्ये मोठी पार्टी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

लेकीसाठी आमिर खान झाला भावुक

‘आयरा हिने नुपूर सारख्या मुलाची निवड केली म्हणून मी आनंदी आहे. नुपूर, आयरा हिला कायम आनंदी ठेवेल. तो माझ्यासाठी जावई नाही तर, माझा मुलगा आहे.. हा फिल्मी डायलॉग आहे. पण हेच सत्य आहे. मी प्रचंड भावुक झालो आहे. लेकीच्या पाठवणीच्या वेळी मी प्रचंड रडेल.’ असं आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला होता.

आयरा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी किड असल्यामुळे आयरा कायम चर्चेत असते. आयरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आयरा कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असते. आता सध्या आयरा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

आयरा हिने इतर स्टारकिड्स प्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. आयरा हिने नुपूर याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री नसली तरी आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आयरा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.