आमिर खानच्या पूर्व पत्नींचा मराठमोळा अंदाज; आयराच्या हळदीत नेसली नऊवारी साडी

आयराच्या लग्नासाठी आमिर खानच्या दोन्ही पूर्व पत्नी एकत्र आल्या आहेत. केळवणपासून हळदीच्या कार्यक्रमापर्यंत किरण रावचा संपूर्ण सहभाग पहायला मिळतोय. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. तर किरण ही आयराची सावत्र आई आहे. 

आमिर खानच्या पूर्व पत्नींचा मराठमोळा अंदाज; आयराच्या हळदीत नेसली नऊवारी साडी
आयरा खानच्या हळदीत मराठमोळा अंदाजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 1:58 PM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. आयराचा होणारा पती मराठी असल्याने लग्नापूर्वीचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण मराठी पद्धतीने करण्यात आलं होतं. आता आयरा आणि नुपूरच्या हळदी समारंभात आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नींचा मराठमोळा अंदाज पहायला मिळत आहे. मुलीच्या लग्नानिमित्त आमिर आणि रिना यांच्या घरांना रोषणाई करण्यात आली आहे. नुपूरच्या घरातच हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव या दोघीसुद्धा नऊवारी साडीत तिथे पोहोचल्या आहेत.

हळदीच्या कार्यक्रमात रिना दत्ता यांनी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर किरण रावने फिकट जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. किरण केसांत गजरासुद्धा माळला आहे. या दोघींसोबतच इतरही पाहुणे पारंपरिक मराठी पोशाखात पहायला मिळत आहेत. येत्या 3 जानेवारी रोजी आयरा आणि नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. हा लग्नसोहळा महाराष्ट्रीयन पद्धतीनुसारच पार पडणार आहे. लग्नानंतर आयरा आणि नुपूर हे मुंबई ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. या रिसेप्शनची तारीख 10 जानेवारी असल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

नऊवारी साडीत किरण रावचा मराठमोळा अंदाज

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

आमिरची पहिली पत्नी रिना दत्ताचा मराठमोळा लूक

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

आयरा खानचा होणारा पती नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान आयरा तिच्या वडिलांसोबत राहत होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा ओळख नुपूरशी झाली. सुरुवातीला ही ओळख आयराच्या फिटनेससाठीच झाली होती. हळहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. 2021 मध्ये आयराने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. सप्टेंबर 2021 मध्ये नुपूरने आयराला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी साखरपुडा जाहीर केला. नैराश्य आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांचा सामना करताना नुपूरने खूप साथ दिल्याचं आयराने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.