आमिर खानच्या दुसऱ्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, ‘फक्त पत्नी म्हणून राहिली असती तर…’

Aamir Khan ex wife : अनेक वर्षांनंतर अखेर किरण रावने सोडलं घटस्फोटावर मौन, आमिर खानची पत्नी म्हणून राहिली असती तर, भयानक परिस्थितीचा करावा लागला असता सामना..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण राव हिच्या वक्तव्याची चर्चा

आमिर खानच्या दुसऱ्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, 'फक्त पत्नी म्हणून राहिली असती तर...'
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 9:57 AM

Aamir Khan ex wife : अभिनेता आमिर खान याने दोन वर्षांपूर्वी दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत असलेलं नातं देखील संपवलं आहे. दोघांना परस्पर सहमतीने घटस्फोट केल्याची माहिती चाहत्यांना दिली. अचानक आमिर – किरण यांच्या घटस्फोटाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. किरण – आमिर यांच्या घटस्फोटाला दोन वर्ष झाली आहेत. तरी देखील आजही अनेक जण किरण हिला आमिर खान याची पत्नी म्हणून ओळखतात. यावर किरण राव हिने मौन सोडलं. एवढंच नाही तर, कायम आमिर याची पत्नी म्हणून राहिली असती तर किरणवर कोणती वेळ आली असती यावर देखील किरणने मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत किरण राव म्हणाली, ‘लोकं माझ्या जवळ येतात आणि विचारतात तू आमिर खान याची पत्नी आहेस ना? कदाचित त्यांना माझं नाव माहिती नसेल. पण मी त्यांना सांगते ‘मी आमिर खानची एक्स पत्नी आहे.’ मला गोष्टीमुळे काहीही फरक पडत नाही. मला माझे मित्र आहेत. मी माझ्या अटींवर आयुष्य जगतो…’

‘लग्ना प्रत्येकाची ओळख आणि स्पेस असायला हवा आणि ही गोष्ट प्रचंड गरजेची आहे. असं मला वाटतं. प्रत्येक जण मला एक्स वाईफ किंवा आमिरच्या पत्नीच्या रुपात ओळखतो. जर मला माझ्यावर विश्वास नसता तर, फक्त पत्नी म्हणून राहिली असती. नाही तर डिप्रेशनमध्ये गेली असती. आता अनेक गोष्टींचा विचार करुन मला हसायला येतं…’ असं देखील किरण राव म्हणाली.

किरण राव हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किरण सध्या ‘लापता लेडीज’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या किरण सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. किरण आणि आमिर यांची ओळख देखील सिनेमाच्या सेटवरच झाली होती. ‘लगान’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘लगान’ सिनेमात किरण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात होती.

2005  मध्ये किरण – आमिर यांनी लग्न केलं. पण दोघांंचं नातं फार काळ टिकलं नाही. 2022 मध्ये आमिर – किरण यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोट झाला असला तरी, अनेक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये देखील दोघे एकत्र दिसतात.

Non Stop LIVE Update
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...