AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान याच्या ऑनस्क्रिन मुलीचं निधन; मृत्यूचं कारण थक्क करणारं

Aamir Khan | आमिर खान याच्या ऑनस्क्रिन मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'दंगल गर्ल' ने वयाच्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... मृत्यूचं कारण थक्क करणारं, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या ऑनस्क्रिन लेकीची चर्चा

आमिर खान याच्या ऑनस्क्रिन मुलीचं निधन; मृत्यूचं कारण थक्क करणारं
| Updated on: Feb 17, 2024 | 2:04 PM
Share

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधून एक धक्कादयक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालं आहे वयाच्या 19 व्या वर्षा सुहानी भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला आहे. सुहानी भटनागर हिने ‘दंगल’ सिनेमात अभिनेता आमिर खान याच्या लेकीची भूमिका साकारली होती. सुहानी हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. अपघातानंतर अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती समोर येत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी भटनागर हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरच्या मृत्यूचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. अभिनेत्रीच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्यामुळे सुहानी हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागलं.

सुहानी हिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान अभिनेत्रीचं निधन झालं. सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमातून सुहानी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमानंतर सुहानी हिला अनेक जाहिरातींमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली.

सांगायचं झालं तर, ‘दंगल’ सिनेमानंतर सुहानी हिला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्या. पण सुहानी हिने शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं. ‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल…’ असं वक्तव्य खुद्द सुहानी हिने एका मुलाखतीत केलं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानी हिचं निधन झालं आहे.

सुहानी भटनागर 25 नोव्हेंबर 2021 नंतर कधीच इन्स्टाग्रामवर सक्रिय नव्हती. त्याआधी सुहानी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायची. फार कमी वयात सुहानी हिने स्वतःची ओळख भक्कम केली होती. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. आता अनेक चाहते सुहानी भटनागर हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.