किरणचं दिग्दर्शन, आमिर निर्माता, घटस्फोटानंतरही ‘हम साथ साथ है’!

Aamir khan kiran Rao : 'लाल सिंग चड्ढा' मध्ये घटस्फोटानंतरही आमिर आणि किरणने एकत्र काम केले होते. आताही आमिर-किरणचा पुढचा प्रोजेक्ट असलेल्या सिनेमाचं शुटिंग पुण्यात सुरु झालंय. मीड डेच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असेल

किरणचं दिग्दर्शन, आमिर निर्माता, घटस्फोटानंतरही 'हम साथ साथ है'!
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 6:14 PM

मुंबई : आमिर खान (Aamir khan) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॅलेंटेड नाव, आपल्या कलाकृतींनी तो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. त्याने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक उत्तोमोत्तम सिनेमे दिलेत. प्रेक्षकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा आमिर प्रयत्न करतो. दुसरीकडे मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीतही आमिर खान तेवढाच चर्चेत असतो. नुकताच त्याने त्याची पत्नी किरण रावबरोबर (Kiran Rao) घटस्फोट घेतला. आमिर आणि किरण यांनी संयुक्तरित्या घटस्फोटाचं निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर लाखो फॅन्सला झटका बसला. पण फॅन्सला आधार देताना, ‘आम्ही इथून पुढेही सोबत काम करत राहू’ , असा प्रगल्भ मेसेज दोघांनीही दिला. नुसता मेसेज देऊनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यदृष्टीने पाऊलही टाकलंय. किरण राव दिग्दर्शित चित्रपटासाठी आमिर खान निर्माता म्हणून भूमिका बजावणार आहे.

किरणचं दिग्दर्शन, आमिर निर्माता!

‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये घटस्फोटानंतरही आमिर आणि किरणने एकत्र काम केले होते. आताही आमिर-किरणचा पुढचा प्रोजेक्ट असलेल्या सिनेमाचं शुटिंग पुण्यात सुरु झालंय. मीड डेच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असेल, जे सगळेजण पाहू शकतील. किरण राव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे तर आमिर खान या चित्रपटासाठी निर्माता असेल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा किरण राव यांनी आमिर खानला या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळी आमिर खानला ती स्क्रिप्ट खूप आवडली. तो लगेच चित्रपट प्रोड्युस करण्यासाठी तयार झाला.

या चित्रपटाची कथा विप्लव गोसामी यांनी लिहिली आहे. ‘जमतारा सबका नंबर आएगा’ फेम स्पर्श श्रीवास्तव आणि ‘कुर्बान हुआ’ फेम प्रतिभा रंता आणि 15 वर्षीय नितांशी गोयल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पहिले शेड्यूल 20 जानेवारीपर्यंत चित्रित केले जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये निर्मिती पुन्हा सुरू होईल. किरण राव यांना 15 एप्रिलपर्यंत शूट पूर्ण करायचे आहे.

आमिर किरणचा घटस्फोट

आमिर आणि किरण 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आमिर आणि किरणने 3 जुलै 2021 रोजी घटस्फोटाचा निर्णय घेतला.आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करत आहोत. ज्यामध्ये आम्ही पती-पत्नी नसून पालक आणि कुटुंब म्हणून एकमेकांना साथ देऊ. एकीकडे आमिर किरणच्या चित्रपटाची निर्मिती करत असताना, किरण राव देखील आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ यात निर्मात्यांपैकी एक आहे. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.

2001 मध्ये आमिर खान किरण रावला पहिल्यांदा ‘लगान’च्या सेटवर भेटला, जिथे ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी आनंदाने वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’

Urfi javed : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेदचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायळ

विजय माल्याचा ‘किंगफिशर’ खरेदी करणारा, राज कुंद्राचा पूर्व बिझनेस पार्टनर अभिनेता सचिन जोशी ईडीच्या रडारवर, 410 कोटींची संपत्ती जप्त

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.