Aamir Khan याच्या लेकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, जावयाबद्दल अभिनेता असं का म्हणाला?

Aamir Khan | आमिर खान याच्या घरात लवकरच वाजणार सनई - चौघडे, आयरा खान हिच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, पण जावई नुपूर शिखरे याच्याबद्दल असं का म्हणाला अभिनेता? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या लेकीच्या लग्नाची चर्चा... कधी होणार आयरा नवरी?

Aamir Khan याच्या लेकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, जावयाबद्दल अभिनेता असं का म्हणाला?
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:03 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याचा विरोध केला. दरम्यान अनेक दिवसांपासून अभिनेता बॉलिवूडपासून दूर आहे. आमिर याने सध्या ब्रेक घेतला असून कुटुंबाला वेळ देत असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, अभिनेता त्याच्या लेकीमुळे देखील तुफान चर्चेत आहे. गेल्यावर्षी आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. आयरा लवकरच बॉयफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

आरया हिचं लग्न कधी आहे? असा प्रश्न सतत अभिनेत्याला विचारण्यात येत होता. अशात नुकताच झालेल्या मुलाखतीत आमिर खान याने लेकीच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. शिवाय जावयाबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आमिर खान आणि लेक आयरा खान यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

आमिर खान म्हणाला, ‘३ जानेवारी रोजी आयरा हिचं लग्न आहे. ज्या मुलाला आयरा हिने जोडीदार म्हणून निवडलं आहे, त्याच नाव नुपूर असून तो फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर चांगला मुलगा आहे. जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा माझ्या मुलीसाठी नुपूर खंबीर पणे उभा राहिला. तो उत्तम जोडीदार आहे आणि दोघांना एकत्र पाहून मला प्रचंड आनंद होतो.’

हे सुद्धा वाचा

‘आयरा हिने नुपूर सारख्या मुलाची निवड केली म्हणून मी आनंदी आहे. नुपूर, आयरा हिला कायम आनंदी ठेवेल. तो माझ्यासाठी जावई नाही तर, माझा मुलगा आहे.. हा फिल्मी डायलॉग आहे. पण हेच सत्य आहे. मी प्रचंड भावुक झालो आहे. लेकीच्या पाठवणीच्या वेळी मी प्रचंड रडेल.’ असं देखील आमिर खान म्हणाला.

आयरा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी किड असल्यामुळे आयरा कायम चर्चेत असते. आयरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आयरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आयरा कायम बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ज्यामुळे आयरा हिला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.