Aaradhya Bachchan हिच्या वकिलांचं मोठं वक्तव्य; न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हणाले, ‘सेलिब्रिटींना आता मिळणार…’

'प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे....', दिल्ली हायकोर्टाने निर्णय सुनावल्यानंतर आराध्या बच्चन हिच्या वकिलांचं मोठं वक्तव्य... नक्की काय म्हणाले आराध्याचे वकील

Aaradhya Bachchan हिच्या वकिलांचं मोठं वक्तव्य; न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हणाले, 'सेलिब्रिटींना आता मिळणार...'
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 10:46 AM

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने निर्णय सुनावला आहे. आराध्या बच्चन हिच्यबद्दल व्हायरल झालेल्या फेक न्यूजविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने आराध्याबद्दल कोणताही व्हिडीओ अपलोड करण्यास बंदी घातली आहे, तसेच आराध्या बच्चनच्या प्रकृतीबद्दल खोट्या बातम्या पसरवणारे सर्व व्हिडिओ, फोटो आणि इतर गोष्टी त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या आराध्या आणि बच्चन कुटुंब चर्चेत आहे.

दिल्ली हायकोर्टात आराध्याची बाजू मांडणारे वकील यांनी याप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय दिल्ली हायकोर्टाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं देखील आराध्याचे वकील अमित नाइक यांनी सांगितलं आहे. अमित नाइक म्हणाले, ‘मला वाटतं, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश हा मानहानी, गोपनीयता, नियम, व्यक्तिमत्त्व यावर महत्त्वाचा निर्णय आहे. बच्चन कुटुंबाचं नाव आपल्या फायद्यासाठी वापरणं चुकीचं आहे.’

अभिषेक बच्चन याने घेतलेल्या निर्णयाबद्दल अमित नाईक म्हणाले, ‘अभिषेक बच्चन याने घेतलेल्या निर्णयाला माझं समर्थन आहे. तो याप्रकरणी पुढे आला. कोणीतरी हिंमत दाखवली. यापुढे सोशल मीडियावर लहान मुलांबद्दल कोणतही अफावा पसवण्याचा प्रयत्न केला, तर हे उत्तम उदाहरण आहे. यामुळे इतर सेलिब्रिटींना देखील हिंमत मिळणार आहे.’ असं देखील अमित नाईक म्हणाले.

हे सुद्धा वाचा

न्यायमूर्ति सी हरिशंकर म्हणाले, ‘प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये, याची जबाबदारी युट्यूबने घ्यावी… प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. मग ते सेलिब्रिटी किड्स असो किंवा सामान्य मुलं. मुलाबद्दल विशेषत: शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे कायद्याने पूर्णपणे असह्य आहे.’

याआधी देखील आराध्याला ट्रोल करणाऱ्यांनी अभिषेकने दिलं सडेतोड उत्तर

आराध्याला कायम ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत स्पॉट केलं जातं. वयाच्या ११ व्या वर्षी आराध्याने अनेकदा ट्रोलिंगचा सामना केला. डिसेंबर 2021 मध्ये अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर त्याची मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्या सडेतोड उत्तर दिलं होतं.

अभिषेक म्हणाला, “मी स्वत: सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर झालेल्या टीकांना मी सहन करू शकतो पण आराध्याला लक्ष्य करणं हे मला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते मी सहन करणार नाही. मी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे मला ट्रोल करण्यापर्यंत ठीक आहे. पण माझ्या मुलीला त्यात ओढू नका. जर तुम्हाला खरंच काही म्हणायचं असेल तर तोंडासमोर येऊन बोला”, असं तो म्हणाला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.