Abdu Rozik-MC Stan | एमसी स्टॅन – अब्दु रोझिकमधील भांडण अखेर मिटलं; रॅपरला भेट दिली ‘ही’ दुर्मिळ गोष्ट

बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर आहलुवालिया यांची मंडली होती. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये अब्दुने एमसी स्टॅनच्या आईसोबत फोटो न काढल्यामुळे दोघांमधील शीतयुद्ध सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.

Abdu Rozik-MC Stan | एमसी स्टॅन - अब्दु रोझिकमधील भांडण अखेर मिटलं; रॅपरला भेट दिली 'ही' दुर्मिळ गोष्ट
Abdu Rozik and MC StanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 9:00 AM

दुबई : ‘बिग बॉस 16’च्या घरातील मंडलीचा भाग असलेले एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक यांचा वाद जगजाहीर आहे. दोघंही बिग बॉसच्या घरात एकाच मंडलीत राहून खेळ खेळले, मात्र शो संपल्यानंतर त्यांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाली. अब्दुने स्टॅनवर बरेच आरोप केले. या सर्व वादानंतर आता या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं कळतंय. ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दुने नुकतीच दुबईतील एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. 25 एप्रिल रोजी हा कॉन्सर्ट पार पडला होता. या कॉन्सर्टला हजेरी लावत अब्दुने स्टॅनसोबतचं भांडण कायमचं मिटवलंय.

या कॉन्सर्टनंतर अब्दुने एमसी स्टॅनला संयुक्त अरब अमिरातीतील दुर्मिळ गुलाबसुद्धा भेट म्हणून दिला. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘कधीही न मरणारा हा दुर्मिळ गुलाब दीर्घायुष्य, प्रेम आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या पोस्टमध्ये त्याने स्टॅनलाही टॅग केलंय. एब्दुने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये स्टॅनच्या परफॉर्मन्सचे काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

“मला असं वाटतं की हा गुलाब त्याला भेट म्हणून देणं म्हणजेच आमच्या दोघांच्या मैत्रीचा खास संदेश आहे. अनेकदा सेलिब्रिटी असणं हे खूप मोठं आव्हान असतं. कारण आम्हाला अधिक प्रेम मिळतं आणि तेवढाच द्वेषसुद्धा. त्यामुळे एकमेकांशी प्रेमाने वागणं आणि इतरांसमोर चांगलं उदाहरण सादर करणं हे महत्त्वाचं ठरतं”, अशी प्रतिक्रिया अब्दुने दिली.

बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर आहलुवालिया यांची मंडली होती. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये अब्दुने एमसी स्टॅनच्या आईसोबत फोटो न काढल्यामुळे दोघांमधील शीतयुद्ध सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. एका म्युझिक कंपनीने अब्दु आणि एमसी स्टॅन यांच्यासोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र स्टॅनच्या टीमने अब्दुसोबत काम करण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जात होतं.

10 मार्च रोजी दिग्दर्शक आणि बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक साजिद खानने अब्दुची भेट घेतली होती. यावेळी त्याने एमसी स्टॅनला कॉल केला होता. मात्र नंतर कॉल करतो असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. अब्दुने पाठवलेल्या व्हॉइस नोटलाही त्याने काहीच उत्तर दिलं नव्हतं. या घटनेच्या एक दिवसानंतर अब्दु आणि स्टॅन हे बेंगळुरूमध्ये होते. एमसी स्टॅनच्या शोला हजेरी लावून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा अब्दुने त्याच्या मॅनेजरकडे व्यक्त केली होती. मात्र अब्दुने शोच्या ठिकाणी राहू नये, अशी स्टॅनची इच्छा असल्याचं सेक्युरिटी टीम आणि आयोजकांनी सांगितलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.