Abdu Rozik याच्या अडचणीत मोठी वाढ; गायकाविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल!

अब्दु रोझिक याने असं काय केलं ज्यामुळे मुंबई पोलिसांनी गायका विकोधात दाखल केली तक्रार ! अब्दु रोझिक याच्या अडचणींमध्ये होणार मोठी वाढ?

Abdu Rozik याच्या अडचणीत मोठी वाढ; गायकाविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल!
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:47 PM

मुंबई : ‘बिग बॉस 16’ फेम अब्दु रोझिक (abdu rozik) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बिग बॉसनंतर अब्दुच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अब्दुचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच अब्दु याने मुंबई येथील अंधेरी याठिकाणी स्वतःचा हॉटेल सुरु केला आहे. (abdu rozik restaurant) अब्दुच्या हॉटेलमध्ये फराह खान, सोनू सूद, अर्चना गौतम आणि साजिद खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पण आता अब्दु वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या अब्दुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अब्दु बंदूक लोड करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मुंबई पोलिसांत देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोल्डन बॉईजच्या बॉडीगार्डनी अब्दू रोजिकच्या हातात बंदूक दिली होती. गोल्डन बॉईज सनी नानासाहेब वाघचोरे आणि सनी गुर्जर हे देखील अब्दु रोजिकच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या बॉडीगार्डने ही बंदूक अब्दू रोजिकला दिली होती. बॉडीगार्डकडे पिस्तूल ठेवण्याचा परवाना असला तरी. मात्र अब्दू रोजिकच्या हातात पिस्तूल पाहून लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

एवढंच नाही तर, जर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी कोणाला गोळी लागली असती तर… असं देखील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात  आलं आहे.. महत्त्वाचं म्हणजे ओशिवरा येथील अब्दुच्या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलेब्स उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अब्दु विरोधात तक्रार दाखल केली आहे. (mumbai police complaint against abdu rozik)

हे सुद्धा वाचा

वाजाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अब्दुच्या चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहेत. पण आतापर्यंत याप्रकरणी अब्दु रोझिक आणि त्याच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. तर सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘गोल्डन बॉडीजच्या बॉडीगार्डचा परवाना रद्द करण्यात यावा.” तर दुसर्‍या नेटकऱ्याने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अब्दु रोझिक ‘लाँग सन शॉर्ट सन’ शो सुरू करणार

अब्दु रोझिकबद्दल याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, गायक लवकरच साजिद खानसोबत ‘लाँग सन शॉर्ट सन’ हा शो सुरू करण्याची शक्यता आहे.पण त्याचा शो टीव्हीवर सुरू होणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.