पहिल्याच नजरेत पडला प्रेमात, 4 महिने केले डेट, अब्दू रोजिकने लव्ह स्टोरीबद्दल केला खुलासा, म्हणाला, कमी उंची..
अब्दू रोजिक याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अब्दू रोजिक हा बिग बाॅसच्या घरात सहभागी झाला होता. अब्दू रोजिक याची भारतात देखील फॅन फाॅलोइंग चांगली आहे. अब्दू रोजिकने मुंबईमध्ये एका हाॅटेलला सुरूवात केली. अब्दू रोजिक हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.
अब्दू रोजिक हा बिग बॉसमध्ये धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना देखील अब्दू रोजिक दिसला. अब्दू रोजिक बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून त्याची भारतामधील फॅन फॉलोइंग ही चांगलीच वाढल्याचे बघायला मिळाले. अब्दू रोजिक हा बिग बाॅसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारा स्पर्धेक ठरला. विशेष म्हणजे अनेकांना वाटले की, अब्दू रोजिक हाच बिग बाॅसचा विजेता होईल. काही कारणामुळे अब्दू रोजिक याला बिग बाॅस अचानक सोडावे लागले. आता अब्दू रोजिक हा परत एका चर्चेत आलाय.
अब्दू रोजिक हा प्रेमात पडलाय हेच नाही तर त्याचे लग्न 7 जुलै रोजी दुबईत पार पडणार आहे. अब्दू रोजिक याने आता आपल्या लव्ह स्टोरीबद्दल मोठा खुलासा केलाय. अब्दू रोजिक म्हणाला की, माझी आणि अमीराची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली. मी पहिल्याच भेटीत अमीराच्या प्रेमात पडलो. ती दिसायला अत्यंत सुंदर असून तिचे मोठे केस आहेत.
पुढे अब्दू म्हणाला की, मी खरोखरच खूप जास्त भाग्यवान आहे, मला माझे प्रेम मिळाले. पहिल्याच भेटीत मी तिला माझी ओळख सांगितली आणि आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. तेंव्हापासून आम्ही फोनवर सतत बोलत आहोत. चार महिन्यांपासून आम्ही फोनवर बोलत आहोत. अमीरा सध्या काॅलेजमध्ये शिक्षण घेते, बिझनेसचे तिचे शिक्षण सुरू आहे.
मी ज्यावेळी अमीराला पहिल्यांदा भेटलो, त्यावेळीच मला समजले ही माझी जीवनसाथी होऊ शकते. ती मला योग्य मुलगी भेटली आहे. हेच नाही तर अमीरा मला खूप जास्त समजून घेते आणि माझा खूप जास्त मान ठेवते. ती प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत असते. अमीराला मिळून मला सर्वात एक मोठी आणि महत्वाची गोष्ट समजली.
अमीराला भेटल्यानंतर मला समजले की, कमी उंची असलेल्या लोकांना देखील प्रेम मिळते. आमच्या दोघांचे लव्ह मॅरेज होईल, मुंबईवरून सर्व मित्र माझ्या लग्नाला दुबईला येणार आहेत. हेच नाही तर सलमान खान देखील लग्नाला येणार असल्याचे अब्दू रोजिक याने म्हटले आहे. आता अब्दू रोजिक याच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.