मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप

'सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला दाखवून देईल मी काय आहे', असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. त्याचसोबत बिग बॉस हिंदीचं घर कसं चालतं यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप
सलमान खानला अभिजीत बिचुकले यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 3:53 PM

मुंबई : क्वॉन्टव्हर्सी किंग अभिजीत बिचुकले (Abhijit Bhichukale), त्यांची विधानं आणि त्यावरून होणारा वाद महाराष्ट्राला नवा नाहीये. आताही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकले यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला तेव्हा त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ‘सलमान खान (salman khan) स्वत: ला काय समजतो? त्याला दाखवून देईल मी काय आहे’, असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. त्याचसोबत बिग बॉस हिंदीचं (big boss 15) घर कसं चालतं यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

बिचुकले सलमानबद्दल काय म्हणाले?

बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर बिचुकलेंनी निशाणा साधलाय. ‘सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवर प्रहार केलाय. ‘सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, असंही ते म्हणालेत.

त्यांच्या आग्रहाखातर मी शोमध्ये राहिलो

तुम्हाला शोमधून बाहेर काढलं गेलं की तुम्ही बाहेर पडलात यावर बोलताना बिचुकले म्हणाले, ‘मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाहीये. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो.’

पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार

‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अभिजीत बिचुकले हे याआधी मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी केलेली विधानं चर्चेत होती. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सध्या ते बिगबॉस हिंदीमध्ये सहभागी झाले होते. नुकतेच ते बिगबॉसच्या घराबाहेर पडले आहेत. आता त्यांनी बिग बॉसचं घर आणि सलमान खानवर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

Badhai Do : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या होणार ट्रेलर रिलीज; फर्स्ट लूकचं पोस्टर व्हायरल

आधी म्हणाली वामिकाचा फोटो दाखवणार नाही, काल फोटो व्हायरल झाल्यावर आज अनुष्काची चाहत्यांना नम्र विनंती!

‘हाऊज द जोश’ नंतर विकी कौशलचा नवा सिनेमा कोणता? पाकचे तुकडे करणाऱ्या जनरलची भूमिका साकारणार, फर्स्ट लूक व्हायरल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.