दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत... दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे 'हे' 5 सिनेमे ट्रेंड... दहशतवादी अबू कताल याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे...

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक प्राणघातक हल्ले घडवून आणण्याच्या भूमिकेमुळे, अबू कताल किंवा फैसल नदीम हे एनआयए आणि भारतीय लष्करासह सुरक्षा यंत्रणांना मोस्ट वॉन्टेड होते. अबू कताल हा 26 \11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जवळचा होता. भयंकर दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे अनेक सिनेमे बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहे. दरम्यान, अबू कताल याच्या निधनानंतर बॉलिवूडचे 5 सिनेमे ट्रेंड होत आहेत. जे दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करतात.
‘रोझा’ : 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘रोझा’ सिनेमाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं होतं. सिनेमात अरविंग स्वामी आणि मधू मुख्य भूमिकेत होते. तामिळनाडूतील खेड्यातील एका सामान्य मुलीची कहाणी, जी जम्मू-काश्मीरमधील एका गुप्त मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर आपल्या नवऱ्याला शोधून सोडवायला निघते आणि यशस्वी होते.
‘मां तुझे सलाम’ : अभिनेता सनी देओल, तब्बू आणि अरबाज खान स्टारर सिनेमाचं दिग्दर्शन टीनू वर्मा यांनी केलं. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची कथा एका सैन्य अधिकाऱ्याच्या भोवती फिरत आहे. जे सीमेवरील स्थानिक लोकांच्या सोबतीने दहशतवाद्यांचे धोकादायक मनसुबे उधळून लावतात…




‘ब्लॅक फ्रायडे’ : 2004 मध्ये प्रदर्शित झालेला अनुराग कश्यपचा सिनेमा, हुसैन झैदी यांच्या ब्लॅक फ्रायडे: द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट्स या पुस्तकावर आधारित आहे, ज्याचं दिग्दर्शन आणि लेखन अनुराग कश्यप यांनी केलं आहे. या सिनेमात केके मेननसोबत पवन मल्होत्रासह इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘अ वेडनेस डे’: निरज पांडे दिग्दर्शित सिनेमा 2008 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. काही सुरक्षा अधिकारी आणि एक निनावी कॉलर यांच्यातील संघर्ष दर्शविते. सिनेमाची कथाही नीरज पांडे यांनीच लिहिली आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, जिमी शेरगिल यांच्यासह अनेक अनुभवी कलाकार आहेत.
‘बेबी’ : दिग्दर्शक निरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ सिनेमा 2015 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, अनुपम खेर, राणा दग्गूबाती, डैनी, तापसी पन्नू, केके मेनन, संजीव त्यागी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. सिनेमात परदेशातील दहशतवाद्यांना पकडून भारतात आणण्यासाठी अभिनेता मोठे प्रयत्न करतना दिसत आहे.