सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील किमान 5 जणांचा अपघाती मृत्यू

या घटनेची खातरजमा करताना लखीसरायचे पोलीस अधीक्षक (SP) सुशील कुमार यांनी खुलासा केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमो (SUV) मध्ये दहा जण प्रवास करत होते, त्यांची ट्रकला धडक बसली. "सुमोच्या चालकासह सहा जण जागीच ठार झालेl, तर चार जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलेय," असेही त्यांनी सांगितले.

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील किमान 5 जणांचा अपघाती मृत्यू
sushant singh
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 8:28 PM

नवी दिल्लीः एका दुर्दैवी घटनेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील किमान 5 जणांचा मंगळवारी सकाळी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 333 वर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुशांत सिंगचे कुटुंब ज्या वाहनातून प्रवास करत होते, ते वाहन ट्रकला धडकल्यानंतर हा अपघात झाला. वृत्तानुसार, गीता देवी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून ते पाटणाहून परतत होते. गीता देवी या हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ओपी सिंग यांची बहीण आहेत, जी सुशांत सिंग राजपूतची मेहुणी आहे.

तर चार जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले

या घटनेची खातरजमा करताना लखीसरायचे पोलीस अधीक्षक (SP) सुशील कुमार यांनी खुलासा केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमो (SUV) मध्ये दहा जण प्रवास करत होते, त्यांची ट्रकला धडक बसली. “सुमोच्या चालकासह सहा जण जागीच ठार झालेl, तर चार जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलेय,” असेही त्यांनी सांगितले.

जखमींना उपचारासाठी पाटणा येथे पाठवण्यात आल्याची माहिती

जखमी बालमुकुंद सिंग आणि दिल खुश सिंग यांना उपचारासाठी पाटणा येथे पाठवण्यात आल्याची खातरजमा पोलिसांनी केली. उर्वरित दोन, बाल्मिकी सिंग आणि टोनू सिंग यांना लखीसराय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत.

ड्रायव्हर प्रीतम कुमार यांचा अपघातात मृत्यू

रिपोर्टनुसार, लालजित सिंग (ओपी सिंग यांचा मेहुणा), त्यांची दोन मुले अमित शेखर, राम चंद्र सिंग, बेबी देवी, अनिता देवी आणि ड्रायव्हर प्रीतम कुमार यांचा अपघातात मृत्यू झालाय. सुशांत सिंग राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी त्याच्या वांद्रे फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता, ज्यामुळे त्याचे मित्र, कुटुंब आणि चाहत्यांना धक्का बसला होता. 28 जुलै रोजी बिहारमधील अभिनेता रिया चक्रवर्ती विरुद्ध राजपूतचे वडील केके सिंग यांनी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केल्यानंतर ईडीने गेल्या वर्षी 31 जुलै रोजी दिवंगत अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल नोंदविला होता.

संबंधित बातम्या

‘डिस्को डान्सर’च्या दिग्दर्शकाची आर्थिक स्थिती बिकट, पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडे मागतायत मदत!

Pooja Sawant | हिंदीतही चमकणारा मराठमोळा चेहरा, पूजा सावंतचे नवे फोटो पाहिलेत का?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.