अंकिता लोखंडे टॉप 3 च्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कोण होणार बिग बॉस 17 चा विजेता, थेट यांच्यामध्ये मोठी चुरस
Bigg boss 17 voting trend : बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळते. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल मोठा खुलासा होताना दिसतोय. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन या नुकताच बिग बॉस 17 च्या घरातून बेघर झालाय.

मुंबई : बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. 100 दिवसांपेक्षाही अधिक काळ या शोला झाला. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. बिग बॉस 17 ला त्याचे टाॅप 5 फायनलिस्ट हे मिळाले आहेत. यापैकीच एक जण बिग बॉस 17 चा विजेता होणार आहे. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा बिग बॉस 17 च्या बाहेर पडलाय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात यांच्यामध्ये जोरदार भांडणे ही बघायला मिळाली.
मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे बिग बाॅस 17 चे टाॅप 5 फायनलिस्ट ठरले आहेत. रविवारी 12 वाजेपर्यंत वोटिंग लाइन्स खुली राहणार आहेत. वोटिंग ट्रेंडचा एक धक्कादायक आणि हैराण करणारा रिपोर्ट हा पुढे आलाय. या रिपोर्टनुसार जवळपास सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसंतय.
धक्कादायक म्हणजे या वोटिंग ट्रेंडनुसार अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये देखील नाहीये. द खबरीच्या रिपोर्टनुसार वोटिंग ट्रेंडमध्ये अंकिता लोखंडे ही मागे पडली आहे. हेच नाही तर अंकिता लोखंडे ही साधे टाॅप 3 मध्ये देखील नाहीये. अंकिता लोखंडे ही टीव्ही मालिकांमधील एक मोठा चेहरा नक्कीच आहे. परंतू असे असताना देखील अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये नाहीये.
Breaking #BiggBoss17#RohitShetty to enter the house today, perform stunts with HMs.
He will choose a contrstant for upcoming season of #KhatronKeKhiladi
Kaun Jayega??
— The Khabri (@TheKhabriTweets) January 24, 2024
वोटिंग ट्रेंडनुसार मुनव्वर फारूकी हा टाॅपला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक कुमार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मनारा चोप्रा ही आहे. 28 जानेवारी 2024 पर्यंत वोटिंगसाठी वेळ आहे. यामुळेच यामध्ये काही बदल होण्याची देखील दाट शक्यता आहे. मात्र, अंकिता लोखंडे ही सध्याच्या ट्रेंडनुसार टाॅप 3 मध्ये नाहीये, हे खरोखरच हैराण करणारे आहे.
अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात काही खास गेम खेळण्यापेक्षा अंकिता लोखंडे ही सतत पती विकी जैन याला भांडताना दिसली. फक्त हेच नाही तर विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे दोघेही एकमेकांवर सतत गंभीर आरोप करताना दिसले. यांच्यामधील वाद सतत टोकाला गेल्याचे बघायला मिळाले.