B’Day Special | हृतिकचा पहिला चित्रपट हिट झाला अन त्याच्या वडिलांवर डॉन अबू सालेमने हल्ला केला….

हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 47 वाढदिवस आहे. हृतिकने 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

B’Day Special | हृतिकचा पहिला चित्रपट हिट झाला अन त्याच्या वडिलांवर डॉन अबू सालेमने हल्ला केला....
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:36 PM

मुंबई : हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 47 वाढदिवस आहे. हृतिकने ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी तयार केले आहे. या चित्रपटात राकेश यांना आधी शाहरुख खानला घ्यायचे होते, पण शाहरुखकडे अगोदरच बरेच चित्रपट असल्यामुळे तो व्यस्त होता. त्यानंतर राकेश यांनी या चित्रपटासाठी हृतिकला साईन करण्याचा निर्णय घेतला. (Actor Hrithik Roshan’s 47th birthday today)

‘कहो ना प्यार है’ चित्रपटात अभिनेत्रीच्या मुख्य भुमिकेत राकेश यांना करीना कपूरला (Kareena Kapoor) कास्ट करायचे होते. मात्र, काही कारणास्तव हे शक्य होऊ शकले नाही. राकेश यांनी मित्र अमित यांच्या मुलीला कास्ट केले. या चित्रपटात हृतिकची दुहेरी भूमिका होती ती म्हणजे एक रोहित आणि एक राज, चित्रपटात राजची भूमिका फिट मुलाची होती यामुळे हृतिकला फिट बॉडी बनवावी लागणार होती. यासाठी हृतिकला सलमान खानने (Salman Khan) मदत केली होती. सलमानने त्याच्या जिमची एक्स्ट्रा चावी हृतिकला दिली होती. हृतिकने तेथे येऊन व्यायाम करावा अशी सलमानची इच्छा होती. सलमानने हृतिकला प्रशिक्षण देखील दिले.

‘कहो ना प्यार है’ चित्रपटाची घोषणा केल्यानंतर राकेश रोशन यांना डॉन अबू सालेमचा फोन आला होता. अबू सालेमने त्यांच्याकडे पाच कोटींची मागणी केली होती. पण राकेशने याकडे दुर्लक्ष केले. 2 महिन्यांनंतर पुन्हा राकेश यांना फोन आला आणि परत एकदा पैसेची मागणी करण्यात आली परत एकदा राकेश रोशन यांनी दुर्लक्ष केले. यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शन झाल्यावर 1 आठवड्यानंतर राकेश रोशन यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये राकेशवर 6 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Irfan Pathan | इरफान पठाणच्या ‘कोब्रा’ चित्रपटाचे टीझर रिलीज…

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा… नोरा…..!

(Actor Hrithik Roshan’s 47th birthday today)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.