‘बाप लेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार, ‘आचार्य’ पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

सुपरस्टार राम चरण (Ram Charan) लवकरच आगामी चित्रपट 'आचार्य' (Acharya) मध्ये त्याच्या वडिलांसोबत दिसणार आहे.

'बाप लेक' पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार, 'आचार्य' पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 6:26 PM

मुंबई : सुपरस्टार राम चरण (Ram Charan) लवकरच आगामी चित्रपट ‘आचार्य’ (Acharya) मध्ये त्याच्या वडिलांसोबत दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत असला तरी, हे रामसाठी एक प्रकारचे स्वप्नच आहे. या बाप-लेकाची जोडी बघण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत. आचार्य चित्रपटाच्या टीझर 29 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच उद्या रिलीज होत आहे आणि लाखो चाहते आधीपासूनच या टीझरची वाट पाहात आहेत. (Actor Ram Charan will be seen with his father in the upcoming film ‘Acharya’)

आचार्य चित्रपटात हे बाप लेक नक्की कोणती भूमिका साकारणार आहेत याची कोणतीही कल्पना अद्याप देण्यात आली नाही. चित्रपटात मणि शर्मा आणि चिरंजीवी यांचा कॉम्बो पुन्हा दिसणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.याबद्दल बोलताना राम चरण म्हणतो, माझ्या वडिलांसोबत मी स्क्रीन शेअर करणार आहे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्यासाठी फक्त हा चित्रपट नसून त्यापेक्षा अधिक आहे. मी यासाठी चित्रपटाचे निर्माते आणि पूर्ण टिमचे आभार मानतो.

नुकताच दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) त्यांच्या आगामी आरआरआर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रामचरण आणि एनटीआर दिसत आहेत. रामचरण घोड्यावर बसलेला आहे आणि गाडीवर एनटीआर दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.राजामौली यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला अग्नि आणि पाणी एकत्र येणार आहेत. आलियाने देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला आरआरआरसाठी तयार व्हा राहा, मात्र, आलियाचे पोस्टर अद्यापपर्यंत पुढे आले नाही.

संबंधित बातम्या : 

Release date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला!

Tandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!

विकी कौशलने घेतली कतरिनाची गळाभेट, कॅमेरामुळे गुपित झाले उघड!

(Actor Ram Charan will be seen with his father in the upcoming film ‘Acharya’)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.