Video | बद्रीनाथ मंदिरात नतमस्तक होताना दिसले रजनीकांत, सुख आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना, पाहा खास व्हिडीओ

साऊथ स्टार रजनीकांत यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. रजनीकांत यांची फॅन फाॅलोइंग अत्यंत जबरदस्त आहे. नुकताच रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका हा केला आहे.

Video | बद्रीनाथ मंदिरात नतमस्तक होताना दिसले रजनीकांत, सुख आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना, पाहा खास व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 9:15 PM

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा 10 आॅगस्ट रोजी जेलर हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे रजनीकांत (Rajinikanth) यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाका केला. ओपनिंग डेला जेलर चित्रपटाने तब्बल 48 कोटींची कमाई केली. नेहमीप्रमाणेच रजनीकांत याचा जलवा थिएटरमध्ये बघायला मिळाला. रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाचे निर्देशन नेल्सनने केले आहे. मुळात म्हणजे रजनीकांत यांचा हा चित्रपट (Movie) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चाहत्यांमध्ये रजनीकांत यांच्या जेलरबद्दल चांगलीच क्रेझ आहे.

जेलर चित्रपट रिलीज झाल्यानंतर रजनीकांत हे थेट बद्रीनाथ मंदिरामध्ये पोहचले आहेत. विशेष म्हणजे यावेळी पूजा अर्चना करताना देखील रजनीकांत दिसत आहेत. आता रजनीकांत यांचे बद्रीनाथ मंदिरातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रजनीकांत यांच्या भोवती लोकांनी मोठी गर्दी केली आहे. रजनीकांत यांच्या सुरक्षेसाठी पोलिस देखील तैनात आहेत. रजनीकांत यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते व्हिडीओमध्ये दिसत आहेत. पोलिस कर्मचारी देखील रजनीकांत यांना यावेळी बोलताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन पूजा केल्यानंतर संध्याकाळच्या आरतीसाठी देखील रजनीकांत हे थांबले होते. जेलर चित्रपटाच्या भूमिकेसाठी रजनीकांत यांचे काैतुक केले जात आहे. रजनीकांत यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. सोशल मीडियावर त्यांची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

विशेष म्हणजे जेलर चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांनी तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या याच पुनरागमनाची वाट पाहताना दिसल होते. विशेष बाब म्हणजे 72 वर्षांचे रजनीकांत या चित्रपटामध्ये 33 वर्षांच्या तमन्ना भाटियासोबत दिसले आहेत. जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.