Akshara Singh MMS Leak: प्रायव्हेट व्हिडीओ लीक प्रकरणावर अक्षरा सिंहने सोडलं मौन; म्हणाली..

अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) सध्या तिच्या MMS व्हिडीओ लीक (MMS Leak) प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Akshara Singh MMS Leak: प्रायव्हेट व्हिडीओ लीक प्रकरणावर अक्षरा सिंहने सोडलं मौन; म्हणाली..
Akshara Singh: अंजली अरोरानंतर आता अक्षरा सिंहचा MMS लीक? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 10:09 PM

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) सध्या तिच्या MMS व्हिडीओ लीक (MMS Leak) प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह नावाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. मात्र तो व्हिडीओ खरंच अक्षराचा आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या व्हायरल व्हिडीओवर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. हे कोणी केलंय मला माहीत नाही, पण त्याने मला काही फरक पडत नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया तिने दिली.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षरा म्हणाली, “हा कोणीतरी केलेला खूपच घाणेरडा स्टंट आहे. मला त्या गोष्टीची पर्वा नाही. कोणीही काहीही बोलू द्या. तो MMS व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही. ज्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला त्यांना मला हे विचारायचं आहे की, मी त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे का? अशा कृतीने मी खचून जाणार नाही आणि मला काही फरक पडत नाही.”

यादरम्यान अक्षराचा आणखी एक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवरही भडकली आहे. “मला खूप त्रास देत आहेत. ज्या लोकांना मी आवडते, ते काहीही झालं तरी माझे चाहते राहतली. मी कुठेही गेले, कुठेही काम केलं तरी ते मला पसंत करतील,” असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओमध्ये अक्षरा पुढे म्हणते, “तुम्ही कोणालाही रोखू शकत नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. काम करून स्वतःचं नाव कमवा. तुम्ही लोकांना खोटं नाटक दाखवत आहात. खोटं बोलू नका, खरं बोला.” अक्षराचा हा व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे. पण आताच्या MMS स्कँडलनंतर अक्षराची प्रतिक्रिया म्हणून तो पुन्हा व्हायरल होत आहे.

अक्षरा ही फक्त यूपी बिहारमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहेत. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....