Ankita Lokande होणार आई! Bigg Boss 17 मध्ये अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Ankita Lokande | बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे हिने बेबी प्लानिंगबद्दल केलं मोठं वक्तव्य... कधी होणार अभिनेत्री आई? सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... विकी जैन यांच्यासाठी अभिनेत्रीने घेतला 'बिग बॉस'मध्ये येण्याचा निर्णय

Ankita Lokande होणार आई! Bigg Boss 17 मध्ये अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 8:10 AM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आता अभिनयापासून दूर असली तरी, अंकिता सध्या ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगताना दिसत आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये अर्चना लोखंडे आणि पती विकी जैन यांच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का आहे. विकी ‘बिग बॉस’चा खूप मोठा चाहता आहे. नुकताच अंकिता हिने तिच्या अन्य स्पर्धक ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि फिरोजा खान यांच्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.

अंकिता म्हणाली, पती विकी जैन याला ‘बिग बॉस’ हा शो प्रचंड आवडतो. विकीमुळे मी शोमध्ये येण्यासाठी तयार झाली. त्यामुळे दोघांनी यावर्षी शोचा भाग होण्याचं ठरवलं. एवढंच नाही तर अभिनेत्रीने बेबी प्लानिंगबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. यावर्षी बिग बॉसमध्ये असल्यामुळे अभिनेत्रीने पुढच्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढच्या वर्षी अभिनेत्रीने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. पण ‘बिग बॉस 17’ मध्ये विकी आणि अर्चना यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 17’ आणि शोच्या स्पर्धकांची चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस 17’च्या घरात विकी – अंकिता राहतात वेगळे

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’च्या घरात विकी आणि अंकिता पूर्णपणे वेगळे खेळताना दिसत आहेत. अंकिताला आवडणारे स्पर्धक विकीला आवडत नाहीत, तर दुसरीकडे विकीला आवडणारे घरातील मित्र अंकिताला अजिबात आवडत नाहीत.

यामुळेच पतीसोबत असतानाही अंकिताला अनेकदा एकटेपणा जाणवतो. शोमध्ये अशी परिस्थितीत दिसून आली आहे. यावरुन अंकिताने पती विकी याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण विकीने अंकिताला विश्वास दिला आणि खेळ कसा खेळायचा मला माहिती आहे… असं म्हणाला.

अंकिता आणि विकी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अंकिता हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अंकिता देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण सध्या अभिनेत्री आणि तिचा पती ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहेत.

'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार.
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले...
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले....
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.