प्रसिद्ध अभिनेत्रीने IPS अधिकाऱ्याच्या कारला मारली टक्कर; केस दाखल होताच दिली अशी प्रतिक्रिया

14 मे रोजी डिंपल आणि तिच्या मित्राने जाणूनबुजून कारला टक्कर मारली, असं ड्रायव्हरने त्याच्या तक्रारीत म्हटलंय. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी डिंपल आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने IPS अधिकाऱ्याच्या कारला मारली टक्कर; केस दाखल होताच दिली अशी प्रतिक्रिया
Dimple HayatiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 1:17 PM

हैदराबाद : प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या कारचं नुकतान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरात धडक दिल्याची तक्रार आहे. यामुळे कारचं मोठं नुकसान झालं आहे. डिंपल आणि आयपीएल अधिकारी एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. अधिकाऱ्याच्या ड्राइव्हरने पोलिसांत डिंपल आणि तिच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली आहे.

14 मे रोजी डिंपल आणि तिच्या मित्राने जाणूनबुजून कारला टक्कर मारली, असं ड्रायव्हरने त्याच्या तक्रारीत म्हटलंय. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी डिंपल आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला आणि तिच्या मित्राला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि सीआरपीसीच्या 41ए कलमाअंतर्गत नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर आता डिंपलने ट्विट करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत लिहिलं आहे, ‘ताकदीचा वापर करून चुका लपवल्या जाऊ शकत नाही.’ यासोबतच तिने ‘सत्यमेव जयते’चा हॅशटॅग आणि हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. डिंपलने तिच्या या ट्विटमधून संबंधित आयपीएस अधिकाऱ्याला टोमणा मारल्याचं म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

डिंपलने आजवर काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय. डिंपलचे वडील तमिळ भाषिक आहेत तर आई तेलुगू भाषिक आहे. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा याठिकाणी तिचा जन्म झाला. हैदराबादमध्ये ती लहानाची मोठी झाली. 2017 मध्ये ‘गल्फ’ या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळी ती 19 वर्षांची होती. त्यानंतर तिने ‘युरेका’, ‘देवी 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘गड्डलकोंडा गणेश’ या चित्रपटातील ‘जरा जरा’ या आयटम साँगमध्येही ती झळकली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.