Video | वर्कआउट करताना हेमांगी कवीचा ठुमकत ठुमकत डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे हेमांगी कवीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती वर्कआऊट करताना गाण्यावर थिरकताना दिसतेय.
मुंबई : आपला अभिनय आणि नॉटीनेसमुळे ओळखली जाणारी प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती वर्कआउट करताना गाण्यावर थिरकताना दिसतेय. सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेंडला फॉलो करत तिने हा मजेदार डान्स केला आहे. (actress Hemangi Kavi dancing in workout wear video went viral on social media)
हेमांगी कवी वर्कआऊट वियरमध्ये थिरकली
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेमांगी कवीने ‘दो घुँट मुझे भी पिलादे शराबी’ या हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ शूट करुन तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलाय. तिचा हा डान्स पाहून नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. वर्कआउट वियरमधील हेमांगीचा हा डान्स चांगलाच चर्चेत आला आहे.
ठुमकत, थिरकत हेमांगीचा डान्स
हेमांगीने तिच्या डान्सचा हा व्हिडीओ अपलोड करताच तो व्हायरल झाला आहे. हेमांगीच्या या डान्सवर तिचे चाहते तसेच नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहे. तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दो घुँट मुझे भी पिलादे या गाण्यावर डान्स केला आहे. डान्सच्या सुरुवातीला हेमांगी नेमकं काय करत आहे, हे आपल्याला समजत नाही. नंतर ती स्मीतहास्य करत ठुमकत ठुमकत पुढे जाताना दिसतेय. तसेच नंतर कॅमेऱ्याकडे येत गाण्याच्या तालावर तीने चांगलाच ठेका धरल्याचं आपल्याला पाहायलं मिळतंय. हेमांगीची हीच अदा नेटकऱ्यांना आवडली आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हेमांगी कवी ही एक मराठमोळी तसेच एक कसदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लोखांनी चाहते आहेत. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती सोशल मीडियावर नेहमीच संवाद साधते. तिने नुकताच पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून हजारो चाहते या व्हिडीओला लाईक करत आहेत.
इतर बातम्या :
PHOTO | एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रश्मिका मंदनाच्या हातात दिसला ‘छोटा पाहुणा’, पाहा क्युट फोटो
(actress Hemangi Kavi dancing in workout wear video went viral on social media)