हिना खान हिने शेअर केले अखेर ‘ते’ फोटो, कॅन्सरचे कळताच तिची आई…
टीव्ही अभिनेत्री हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून हिना खान ही सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहे. हिना खान ही स्वत:लाच हिंमत देताना देखील दिसत आहे.
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. आजही हिना खानला अक्षरा या नावाने ओळखले जाते. हिना खान सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना दिसते. हिना खान ही मोठ्या संपत्ती मालकीन देखील आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत हैराण करणारा खुलासा केला. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. सध्या हिना खान हिच्यावर उपचार सुरू असून तिसऱ्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सर आहे. हिना खानने तिचे केसही कट करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. याचाही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. सध्या हिनाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिना खान हिचे हे फोटो पाहून तिचे चाहते हे भावूक झाल्याचे देखील बघायला मिळतंय.
हिना खान हिने शेअर केलेले हे फोटो त्यादिवशीचे आहेत, ज्यादिवशी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला हे समजले. त्यानंतर नेमके काय घडले आणि तिच्या आईची काय अवस्था होती हे या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. हिना खान हिने हे फोटो शेअर करत खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. यावेळी हिना खान ही तिच्या आईबद्दल बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
हिना खान हिने लिहिले की, एका आईचे हृदय तिच्या दु:खाचा आणि वेदनांचा सागर गिळून तिच्या मुलांना शांती, प्रेम आणि सांत्वन देऊ शकतो. माझ्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता, जो शब्दात मांडणे शक्य नव्हते. त्यावेळी तिने माझी काळजी घेतली आणि तिच्या वेदना विसरली. तिला हे सर्व करण्याचा एकच मार्ग मिळाला.
एक सुपरपॉवर नेहमीच आईमध्ये असते. तिची दुनिया बुडत असतानाही मला तिने हाताने आश्रय देण्याचा आणि धीर देण्याचा मार्ग तिला सापडला. आता हिना खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक लोक यावर कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खान हिच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वचजण प्रार्थना करताना देखील दिसत आहेत.