बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने पहिल्यांदा दाखवले बेबी बम्प; वयाच्या ३६ व्या वर्षी होणार अविवाहित आई
लग्नाआधी अभिनेत्रीने केली प्रेंग्नेसीची घोषणा... पहिल्यांदा बेबी बम्प दाखवत म्हणाली..., अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर केला प्रश्नांचा भडीमार, ‘लग्न कधी झालं’,'बाळाचा होणारा पिता कोण?’
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री लग्नाआधी मातृत्वाचं सुख अनुभवलं आहे. तर काही अभिनेत्रींनी गरोदर राहिल्यानंतर लग्न केलं. लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याची घोषणा आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी केली. ज्यामुळे अभिनेत्रींना ट्रोल देखील करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीची घोषणा केली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘…आणि प्रवासाला सुरुवात’ अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. आता अभिनेत्री पहिल्यांदा बेबी बम्प दाखवले आहेत.
वयाच्या ३६ व्या लग्नाआधी आई होणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचं नाव इलियाना डिक्रूझ (Ileana D’cruz) आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आई होणार असल्याची महिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. आता अभिनेत्रीने बेबी बम्पचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘life lately’ असं लिहिलं आहे.
जेव्हा इलियाना हिने प्रेग्नेंसीची घोषणा केली, तेव्हा चर्चांना उधाण आल. अनेक नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘लग्न कधी झालं’,’बाळाचा होणारा पिता कोण?’ असे अनेक प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात येत आहेत. इलियाना डिक्रूझ हिच्या होणाऱ्या बाळाची चर्चा रंगत असताना अभिनेत्रीच्या अफेअरबद्दल देखील अनेक चर्चा रंगत आहेत.
इलियाना हिच्या अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर इलियाना हिचं नाव बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत जोडण्यात आलं. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
महत्त्वाचं म्हणजे इलियाना सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे कायम चर्तेत असते. कतरिना आणि विकी यांच्या लग्नात देखील इलियाना आणि सेबेस्टियन यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून इलियाना आणि सेबेस्टियन एकमेकांमा डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.