अचानक दिसणे झाले बंद, डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना, ‘या’ अभिनेत्रीने केला अत्यंत मोठा खुलासा
अभिनेत्री जस्मिन भसीन हिने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे जस्मिन भसीन हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. जस्मिन भसीन सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही जस्मिन भसीन ही कायमच दिसते.
जस्मिन भसीन हे नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. जस्मिन भसीनने टीव्ही मालिकांमध्ये धमाका केलाय. सोशल मीडियावरही जस्मिन भसीन ही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जस्मिन भसीन दिसते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जस्मिन भसीन हिने भारती सिंह आणि तिच्या कुटुंबियांना खास पार्टी तिच्या घरी दिली. यावेळी जस्मिन भसीनकडून भारती सिंहला अत्यंत महागडे गिफ्ट देखील देण्यात आले. यावेळी जस्मिन भसीनच्या घरी धमाका करताना भारती सिंह दिसली. जस्मिन भसीन ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अली गोनी याला डेट करत आहे. दोघेही सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतात.
आता नुकताच जस्मिन भसीन हिच्यासोबत अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. हेच नाहीतर जस्मिन भसीन हिला दिसत नाहीये. जस्मिन भसीन एका शोसाठी दिल्लीला पोहोचली. त्यावेळी तिने डोळ्यांना लेंस घातले. ज्यावेळी तिने लेंस घातले, त्यावेळी तिला खूप जास्त त्रास होण्यास सुरूवात झाली. हेच नाहीतर तिला दिसणेही पूर्णपणे बंद झाले.
जस्मिन भसीन म्हणाली की, मला सुरूवातीला वाटले की, माझ्या लेंसमध्ये काहीतरी समस्या आहे. मला प्रचंड त्रास होत होता. मला लगेचच डॉक्टरांकडे जायचे होते, परंतू माझ्या शो असल्याने मी लगेचच नाही जाऊ शकले. मला त्या शोमध्ये चश्मा लावून जावे लागले. मला टीमने पूर्णपणे सहकार्य केले. परंतू, एका वेळेनंतर मला हे सहन होत नव्हते.
त्यानंतर मी लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मला सांगितले की, माझ्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झालाय. त्यांनी माझ्या डोळ्यांना आता पट्टी बांधली आहे. मी त्याचवेळी मुंबईला परत आलीये. मी दिल्लीवरून मुंबईला येत उपचार घेतला. पुढे जस्मिन भसीन म्हणाली की, मला खूप जास्त त्रास होतोय.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सर्वकाही ठिक होईल. परंतू मला माझ्या डोळ्यांची काळजी ही घ्यावीच लागणार आहे. माझ्यासाठी या गोष्टी इतक्या जास्त अजिबातच सोप्या नाहीत, कारण मला काहीच दिसत नाहीये. त्रासामुळे मला झोपणेही अवघड झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये सर्वकाही ठिक होईल. आता जस्मिन भसीनच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत.