घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा दुसरा विवाह; लग्नाच्या चार महिन्यांनंतर म्हणते, ‘माझं आयुष्य तर…’

दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर; लग्नाच्या चार महिन्यांच्या प्रवासानंतर चाहत्यांना सांगितलं सत्य

घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा दुसरा विवाह; लग्नाच्या चार महिन्यांनंतर म्हणते, 'माझं आयुष्य तर...'
घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा दुसरा विवाह; लग्नाच्या चार महिन्यांनंतर म्हणते, 'माझं आयुष्य तर...'
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 8:49 AM

मुंबई : साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी कायम तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असते. महालक्ष्मीने दुसरं लग्न निर्माता रविंद्र चंद्रशेखरन (Ravindar chandrasekaran) यांच्यासोबत लग्न केलं आहे. महालक्ष्मी कायम पती रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारी महालक्ष्मी आता दुसऱ्या लग्नामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. लग्नानंतर दोघांचे फोटो तुफान व्हायरल झाले. फोटोंमध्ये त्यांच्या नात्याची खास केमिस्ट्री दिसून आली. दोघे कायम चाहत्यांना कपल्स गोल देताना दिसले. महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या चार महिन्यानंतर अभिनेत्री आयुष्यात झालेल्या बदलांबाबत सांगितलं आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लग्नानंतरच्या चार महिन्यांच्या प्रवासाबाबत सांगितलं आहे. एक खास पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘माझं आयुष्य प्रचंड सुंदर आहे आणि तुम्ही देखील…’ सांगायचं झालं, तर अभिनेत्री पोस्टवरील कमेंट हाईड केल्या आहेत. पण अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर निशाणा साधला. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर महालक्ष्मीने रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाची झाल्याची माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पण फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं.

मीडियारिपोर्टनुसार महालक्ष्मी आणि रविंद्र ओळख यांची ओळख ‘विदियुम वरई काथिरु’ या सिनेमात झाली. सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतरप प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता दोघे वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात.

महालक्ष्मी हिच्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘ऑफिस’, ‘थिरु मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी रानी’ आणि ‘चेल्लामय’ या मालिकांमध्ये काम केलं आहे, तर रविंद्र यांनी देखील अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.