देह व्यापाराचा व्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीचं AIDS ने हृदयद्रावक निधन

सिनेमांमध्ये नाही मिळालं काम, अभिनेत्रीने निवडला देह व्यपाराचा मार्ग, AIDS ने आजार झाल्यानंतर हृदयद्रावक निधन... अखेरच्या क्षणी अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं होतं कठीण...

देह व्यापाराचा व्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीचं AIDS ने  हृदयद्रावक निधन
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 4:33 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांना सुरुवातीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण कालांतराने त्यांची लोकप्रियता कमी होवू लागली. लोकप्रियता कमीमुळे सिनेविश्वात मिळणाऱ्या ऑफर्स देखील कमी होवू लागल्या. सिनेमात काम मिळत नसल्याामुळे काही सेलिब्रिटींची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली. त्यामुळे इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्रींनी चुकीचा मार्ग निवडला. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे अभिनेत्रींनी देह व्यापाराचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री निशा नूर (Nisha Noor)… निशाने असंख्या सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीच्या हृदयद्रावक निधनानंतर सर्वांना धक्का बसला…

निशा नूर प्रामुख्याने तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये झळकली. तिने काही तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये देखील काम केले, परंतु नंतर ती देखील देह व्यापाराच्या व्यवसायाची शिकार झाली आणि त्यानंतर अभिनेत्रीचं हृदयद्रावक निधन झालं. इंडस्ट्री बाहेरुन झगमगणारी असली तरी अनेक रहस्य या झगमगत्या विश्वात आहे, ज्याला इंडस्ट्रीचं काळं सत्य म्हणून ओळखलं जातं.

झगमगत्या विश्वात असे काही कलाकार आहेत, ज्यांना प्रसिद्धी मिळाली पण ते इंडस्ट्रीपासून फार दूर झाले. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे निशा नूर… एक काळ असा होता जेव्हा निशा नूर हिची लोकप्रियता इतर अभिनेत्रींपैक्षा फार जास्त होती. शिवाय तिच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखीस घायाळ होते. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते निशा नूर हिच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी प्रतीक्षेत होते.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्रीने तमिळ आणि मल्याळम भाषेत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. पण एक वेळ अशी आली की तिला सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झालं आणि ती चुकीच्या मार्गावर गेली. जसजशी निशाची प्रेक्षकांमधील क्रेझ कमी होत गेली, तसतशी ती बेरोजगार झाली. कारण निशाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देवून कोणत्याही दिग्दर्शकाला धोका पत्करायचा नव्हता.

सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झाल्यानंतर निशा देहव्यापारात म्हणजेच वेश्याव्यवसायात बळजबरीने अडकली आणि इथूनच तिच्या आयुष्यातील वाईट टप्पा सुरू झाला. सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगू लाहली. अभिनेत्रीला फक्त बदनामीच नाही तर, गंभीर आजाराचा देखील सामना कराला लागल. एड्ससारखा भयंकर आजार अभिनेत्रीला झाला…

रिपोर्टनुसार, 2007 मध्ये निशा दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत सापडली होती. तिची ओळख पटणं देखील कठीण झालं होतं. अभिनेत्रीचं शरीर अशक्त झालं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या क्षणी अभिनेत्रीच्या अंगावर किडे रेंगाळू लागलं. तपसणी झाल्यानंतर अभिनेत्रीला एड्स झाल्याचं निष्पन्न झालं. आजारामुळे अभिनेत्रीचं 23 एप्रिल 2007 निधन झालं.

निशा नूर हिने ‘कल्याण अगाथिगल’ आणि ‘द ग्रेट’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. ज्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. टिक टिक टिक (1981), चुवप्पू नाडा, मिमिक्स अॅक्शन 500, इनिमाई इधो इधो अशा अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. 1980 ते 1986 या काळात निशा तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. निशा हिने के. बालचंदर, विशू आणि चंद्रशेखरसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केलं होतं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.