परिणीती चोप्रा हिच्या पतीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, जाणून घ्या कशी आहे राघव चड्ढाची तब्येत, अत्यंत..
Raghav Chadha surgery : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने उदयपूरमध्ये राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. या लग्नाला अनेक कलाकार पोहचले होते. विशेष म्हणजे अत्यंत शाही पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार राघव चड्ढा याच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलीये.
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. परिणीची चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 2023 मध्ये राजस्थानमधील उदयपूरमध्ये पार पडले. अत्यंत शाही थाटात यांचा विवाहसोहळा हा पार पडला. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. राघव चड्ढा हा आम आदमी पक्षाचा खासदार आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न केले.
सध्या परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्यासोबत लंडनमध्ये आहे. नुकताच राघव चड्ढा याची अत्यंत मोठी शस्त्रक्रिया पार पडलीये. राघव चड्ढाची डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आलीये. हेच नाही तर थोडा जरी उशीर झाला असता तर राघव चड्ढा याची दृष्टी देखील गेली असती. गेल्या एक महिन्यांपासून राघव चड्ढा हा यूकेमध्येच आहे, शेवटी ही शस्त्रक्रिया करण्यात आलीये.
रिपोर्टनुसार राघव चड्ढा याची तब्येत आता शस्त्रक्रियेनंतर स्थिर आहे. त्याला पुढील काही दिवस आरामात करावा लागणार आहे. राघव चड्ढा याच्यासोबत परिणीती चोप्रा ही देखील विदेशातच आहे. शस्त्रक्रियेनंतर राघव चड्ढा याची काळजी घेण्यासाठी ती विदेशातच थांबलीये. पुढील काही महिने देखील राघव चड्ढाला विदेशातच राहवे लागणार असल्याचे सांगितले जाते.
राघव चड्ढा याच्या डोळ्याची समस्या वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले जातंय. डाॅक्टरांनी परवानगी दिल्यानंतर राघव चड्ढा हा भारतात परतेल. सध्या त्याच्यावर रूग्णालयातच उपचार सुरू आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते, परिणीती चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. परिणीती चोप्रा ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची देखील मध्यंतरी जोरदार चर्चा होती. मात्र, परिणीती चोप्रा ही खरोखरच राजकारणात प्रवेश करणार का? यावर काही खुलासा होऊ शकला नाही.