रेखा यांच्या वडिलांच्या एक दोन नाही तर, इतक्या बायका, मुलं तर…

Rekha's Father | रेखा यांच्या वडिलांनी 78 व्या वर्षी केलं 42 वर्ष लहान महिलेसोबत लग्न, अभिनेत्रीच्या वडिलांच्या बायका आणि मुलांबद्दल जाणून व्हाल थक्क..., वडील प्रसिद्ध असताना देखील रेखा यांना कधीच नाही मिळाला मुलीचा दर्जा...

रेखा यांच्या वडिलांच्या एक दोन नाही तर, इतक्या बायका, मुलं तर...
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 3:30 PM

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा एकेकाळी त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असायच्या. त्यांच्या सौंदर्यावर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा होते. आत रेखा अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. रेखा यांच्या लव्हलाईफबद्दल अनेकांना माहिती आहे. पण त्यांच्या वडिलांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रेखा यांचे वडील देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि गडगंज श्रीमंत होते. पण असं असताना देखील रेखा यांना कधीच वडिलांकडून मुलीचं प्रेम आणि मुलीचा दर्जा मिळाला नाही… आज रेखा यांचे वडील, त्यांच्या बायका आणि मुलांबद्दल जाणून घेऊ…

रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन असं होतं. जेमिनी गणेशन यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन तामिळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते. जेमिनी गणेशन यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी तीन वेळा लग्न केलं. एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तर अभिनेत्रीसोबत लग्न न करता त्यांनी मुलांना देखील जन्म दिला.

जेमिनी गणेशन यांचं पहिलं लग्न 1940 मध्ये अलामेलू यांच्यासोबत केलं होतं. तेव्हा जेमिनी गणेशन फक्त 19 वर्षांचे होते. जेमिनी गणेशन आणि अलामेलू यांना चार मुलं होती. जेमिनी गणेशन पहिल्या पत्नीला ‘बॉबजी’ म्हणून हाक मारायचे. लग्न झालेलं असताना, जेमिनी गणेशन यांना अभिनेत्री पुष्पावली यांच्यासोबत देखील प्रेमसंबंध ठेवले होते. पुष्पावली यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत लग्न न करता दोन मुलींना जन्म दिला. त्यांच्या मुलींचं नाव आहे रेखा आणि राधा… दोन मुलींच्या जन्मानंतर देखील जेमिनी गणेशन यांनी पुष्पावली यांच्यासोबत लग्न केलं नाही.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, पहिलं लग्न आणि पुष्पावली यांच्यासोबत रिलेशिपमध्ये असताना जेमिनी गणेशन यांनी दुसरं लग्न केलं. जेमिनी गणेशन यांनी दुसरं लग्न सावित्री यांच्यासोबत केलं. जेमिनी गणेशन आणि सावित्री यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव विजया तर, मुलाचं नाव सतीश कुमार आहे… जेमिनी गणेशन कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. दुसरं लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर जेमिनी गणेशन यांनी तिसरं लग्न केलं.

जेमिनी गणेशन यांनी तिसरं लग्न वयाच्या 78 व्या वर्षी केलं. जेमिनी गणेशन यांनी वयाच्या 78 व्या वर्षी 36 वर्षीय जुलियाना एंड्र्यू यांच्यासोबत तिसरं लग्न केलं. पण दोघांनी मुलांना जन्म दिला नाही. अशा प्रकारे जेमिनी गणेशन यांच्या तीन पत्नी, एक गर्लफ्रेंड आणि आठ मुलं होती. यामध्ये सात मुली एक मुलगा आहे…

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.