नऊ वर्ष लहान शुभमन गिल याच्यासोबत लग्न करणार ‘ही’ अभिनेत्री, ठरले लग्न? म्हणाली, आम्ही…
शुभमन गिल चर्चेत राहणारा भारतीय क्रिकेटर आहे. शुभमन गिलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शुभमन गिलचे नाव गेल्या काही वर्षांपासून अनेक मुलींसोबत जोडले गेले आहे. आता शुभमन गिलचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. अभिनेत्रीनेही मोठा खुलासा केलाय.
अभिनेत्री रिद्धीमा पंडीत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. यावेळी रिद्धीमा पंडीत ही तिच्या कामामुळे किंवा अभिनयामुळे नव्हे तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिद्धीमा पंडीत हिचे नाव सातत्याने एका मोठ्या भारतीय क्रिकेटरसोबत जोडले जात आहे. रिद्धीमा पंडीत आणि शुभमन गिल हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. रिद्धीमा पंडीत ही शुभमन गिल याच्यापेक्षा नऊ वर्षाने मोठी आहे. आता यावर स्पष्टपणे बोलताना रिद्धीमा पंडीत ही दिसली आहे. आता रिद्धीमा पंडीत हिने केलेल्या भाष्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
रिद्धीमा पंडीत म्हणाली की, मी शुभमन गिल याला ओळखतही नाही आणि तो देखील मला ओळखत नाही. हा फक्त आणि फक्त स्टंट दिसतोय. मी या गोष्टींवर का बर काही बोलू? मला वाटते की, या गोष्टी अशाच काहीतरी सुरू आहेत. जर मला अशा रिलेशनच्या गोष्टींमध्ये पडायचे असते तर मी बिग बॉसच्या घरातच हे सर्व केले असते.
जर मी हे सर्व केले असते तर मी अगदी आरामात शोमध्ये टिकले असते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मला असे करायला आवडत नाही. मी खूप जास्त मेहनतीने इथंपर्यंत पोहोचले आहे. मी माझ्या कामासाठी ओळले जाते. मला कधीच आवडणार नाही की, मी रिलेशनमुळे ओळखले जावे. मुळात म्हणजे अशाप्रकारच्या अफवा उडवणे खूप जास्त सोपे असते.
शुभमन गिल हा खूप जास्त प्रसिद्ध क्रिकेटर आहे. कमीत कमी माझे नाव एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत तरी जोडले जात आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे. माझे जर नाव 75 वर्षाच्या व्यक्तीसोबत जरी जोडले गेले असते तरीही लोकांना खरे वाटले असते. मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. काही नवीन प्रोजेक्ट मिळण्याची मला आशा आहे.
मला म्युझिक व्हिडीओ किंवा टीव्हीचा छोटा शो आता करायचा नाहीये. मी सध्या ब्रेकवर आहे पण मला याचे वाईटही वाटत नाही. मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. आता रिद्धीमा पंडीतने शुभमन गिलबद्दल मोठा खुलासा केलाय. रिद्धीमा पंडीतने स्पष्ट सांगितले आहे की, तिचे आणि शुभमन गिलचे काहीच सुरू नाहीये. मात्र, असे असताना देखील काही दिवसांपासून सतत यांच्या नावाची चर्चा आहे.