20 वर्षाने तुटले नाते, घटस्फोटानंतर एक्स पतीच्या नावाने चिडली अभिनेत्री, म्हणाली, माझी एक…
श्रुती पंवार हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. श्रुती पंवार हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. आता अभिनेत्रीकडून अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय. अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटानंतर हा खुलासा केलाय.
टीव्ही अभिनेत्री श्रुती पंवार ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रुती पंवार हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. श्रुती पंवार हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. श्रुती पंवार हिने पतीसोबत 2017 मध्ये घटस्फोट घेतलाय. विशेष म्हणजे श्रुती पंवार हिने अनेक हीट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. श्रुती पंवार हिच्या खासगी आयुष्यात अनेक मोठ्या अडचणी आल्या. मात्र, कधीच त्याचा परिणाम श्रुती पंवार हिने तिच्या करिअरवर होऊ दिला नाही. श्रुती पंवार हिने पती अलोक उल्फतसोबत लग्नाच्या तब्बल 20 वर्षानंतर घटस्फोट घेतला.
आता पहिल्यांदाच त्याबद्दल बोलताना श्रुती पंवार ही दिसली. अभिनेत्री म्हणाली की, मी ज्यावेळी माझ्या करिअरची सुरूवात केली, त्याच्या अगोदरच माझे लग्न झाले होते. त्यामुळेच लोक मला श्रुती उल्फत या नावानेच ओळखतात. पण मी आता फक्त आणि फक्त श्रुती पंवार आहे. परंतू, लोकांना हे समजून घेणे थोडे कठीणच आहे.
मुळात म्हणजे माझ्यासाठी हे फक्त नाव नाही तर माझी खरी ओळख आहे. मी सर्वांना एक विनंती करू इच्छिते की, मला सर्वांनी श्रुती पंवार याच नावाने ओळखावे आणि बोलावे. श्रुती पंवार हिचा एक मुलगा देखील आहे. एक्स पतीसोबत ती आपल्या मुलाच्या सांभाळ करते. अभिनेत्रीने ससुराल गेंदा फुल मालिकेत धमाकेदार भूमिका केली.
2017 मध्ये पतीसोबत घटस्फोट होऊनही लोक तिला श्रुती पंवार ऐवजी श्रुती उल्फत याच नावाने ओळखतात. मात्र, आता तिला या गोष्टीचा प्रचंड त्रास होताना दिसतोय. मात्र, श्रुती हिने अलोक याच्यासोबत घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने घेतला, याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. मात्र, काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय.
श्रुती आणि अलोकचा मुलगा आहे. अभिनेत्री बऱ्याचवेळा मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. श्रुती पंवार ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. विशेष म्हणजे श्रुती पंवार हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. श्रुती पंवार ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. आता अभिनेत्रीने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे.