ना भांगात कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र, सोनाक्षी सिन्हाचे ‘ते’ फोटो व्हायरल, लग्नाला 14 दिवस आणि तोच…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले.

ना भांगात कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र, सोनाक्षी सिन्हाचे 'ते' फोटो व्हायरल, लग्नाला 14 दिवस आणि तोच...
Sonakshi Sinha
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 3:32 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही तिच्या चित्रपटांमुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केले. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचा निर्णय तिच्या घरच्यांना मान्य नसल्याचे सांगितले जाते. मात्र, शेवटी मुलीच्या हट्टामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी होकार दिसला. सोनाक्षी सिन्हा आणि झरीर इक्बाल यांनी सिव्हील मॅरेज केले. ना हिंदू ना मुस्लिम पद्धतीने यांनी लग्न केले.

आता नुकताच लग्नाच्या 14  दिवसांनंतर सोनाक्षी सिन्हा ही मुंबईमध्ये स्पॉट झाली. यावेळी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत झहीर इक्बाल हा देखील होता. यावेळी सोनाक्षी सिन्हा हिने ना भांगामध्ये कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र घातले नव्हते. एकदम साध्या लूकमध्ये यावेळी सोनाक्षी सिन्हा ही दिसत होती. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल याच्यासोबत आनंदी दिसत होती.

विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिने पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ दिल्याचे देखील बघायला मिळतंय. झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे दोघेही तिच्या लग्नाच्या निर्णयामुळे तिच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते.

सोनाक्षी सिन्हा हिचा पती झहीर इक्बाल याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले. सलमान खान यानेच झहीर इक्बाल याला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. झहीर इक्बाल याचे वडील आणि सलमान खान खूप जवळचे मित्र आहेत. हेच नाहीतर सलमान खानच्या वाईट काळात झहीरच्या वडिलांनी सलमान खान याला साथ दिल्याचे देखील सांगितले जाते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.