AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kedarnath | अभिनयविश्व सोडून संन्यास स्वीकारलेली नुपूर अडकली केदारनाथमध्ये; असा वाचला जीव

नुपूरने जवळपास 27 वर्षांपर्यंत टीव्ही इंडस्ट्रीत काम केलं आणि त्यानंतर सर्वच गोष्टींचा त्याग केला. तिने तिचा घर-संसारसुद्धा सोडला. संन्यास स्वीकारल्यानंतर तिने तिच्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली. ग्लॅमरच्या विश्वात आल्यानंतर आलिशान जगणं सोडणं सोपं नसतं.

Kedarnath | अभिनयविश्व सोडून संन्यास स्वीकारलेली नुपूर अडकली केदारनाथमध्ये; असा वाचला जीव
Nupur AlankarImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2023 | 9:11 AM
Share

केदारनाथ | 1 ऑगस्ट 2023 : अभिनयविश्व सोडून संन्यासाचा मार्ग अवलंबलेली अभिनेत्री नुपूर अलंकार नुकतीच केदारनाथ धामच्या दर्शनाला गेली होती. यावेळी तिथे झालेल्या भूस्खलनामुळे नुपूर केदारनाथमध्ये अडकली. अखेर हेलीकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. नुपूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिथे घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली आहे. नुपूर ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र आईच्या निधनानंतर तिने संन्यास स्वीकारला.

नुपूरने ‘शक्तीमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘अगले जनम मोहे बिटिया कीजो’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र 2022 मध्ये सर्व गोष्टींचा त्याग करत तिने संन्यासाचा मार्ग स्वीकारला. आता ती फक्त देवाच्या भक्तीत लीन असते. विविध मंदिरांमध्ये जाऊन ती देवदर्शन करत असते तर कधी मंदिराबाहेर भिक्षा मागत असते. नुपूर स्वत: तिच्या या संन्यासी आयुष्याची झलक सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दाखवते. नुकतीच ती उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या दर्शनाला गेली होती.

नुपूरने केदारनाथचे दर्शन केलं. मात्र तिथून परतत असताना जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे ती अडकली. तिच्यासोबत इतरही काही लोक होते. अखेर नुपूर आणि तिच्यासोबत असलेल्या लोकांना हेलीकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात आलं. नुपूरने या व्हिडीओमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने एक अंश सेल्सियसच्या तापमानात ती तिथे राहिली. टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडल्यानंतर नुपूरने धार्मिक यात्रा सुरू केली होती. आईच्या आजारपणामुळे ती संन्यास घेणं टाळत होती. आईच्या निधनानंतर तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

नुपूरने जवळपास 27 वर्षांपर्यंत टीव्ही इंडस्ट्रीत काम केलं आणि त्यानंतर सर्वच गोष्टींचा त्याग केला. तिने तिचा घर-संसारसुद्धा सोडला. संन्यास स्वीकारल्यानंतर तिने तिच्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली. ग्लॅमरच्या विश्वात आल्यानंतर आलिशान जगणं सोडणं सोपं नसतं. अशा परिस्थितीत नुपूरने काही गोष्टींचा त्याग करत हे नवीन आयुष्य स्वीकारल्याचं चाहत्यांना आवडलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.