वर्षा उसगांवकर यांना लग्नाच्या 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही, अखेर अभिनेत्रीने…
Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. सध्या वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचे 5 वे सीजन धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळतोय. बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला. हेच नाही तर एका टास्कमध्ये निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार असे थेट म्हटले. निकी तांबोळी हिचे हे विधान ऐकून विविध चर्चांना उधाण आले. यावरच रितेश देशमुख याने निकी तांबोळीचा क्लास लावला. यानंतर निकी तांबोळी ही वर्षा उसगांवकर यांची माफी मागताना देखील दिसली. हेच नाही तर आपण चुकीचे बोलल्याचेही निकी तांबोळी हिने मान्य केले.
वर्षा उसगांवकर यांचे लग्न 2000 मध्ये अजय शर्मा यांच्यासोबत झाले. मात्र, सुरूवातीला वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या घरी स्पष्टपणे सांगितले होते की, मला लग्न करायचे नाही. मात्र, घरच्यांचा खूप जास्त दबाव असल्याने अखेर वैतागून वर्षा उसगांवकर यांनी लग्नाला होकार दिला. वर्षा उसगांवकर यांचे लग्न अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बहिणीच्या घरीच पार पडले.
वर्षा उसगांवकर आणि अजय शर्मा यांच्या लग्नाला आता तब्बल 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांना एकही अपत्य नाहीये. निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार म्हटल्यावर त्यांनी थेट म्हटले की, मुले होऊ देणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू, यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
अजय शर्मा यांच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर वर्षा उसगांवकर या अभिनेता नितिश भारव्दाजच्या प्रेमात पडल्या होत्या. हेच नाही तर सेटवर यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी अशी चर्चा होती की, वर्षा उसगांवकर आणि नितिश भारव्दाज हे लग्न देखील करतील. मात्र, काही वर्षांनी यांचे रस्ते वेगळे झाले.
वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त मराठीच चित्रपट नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही धमाका केलाय. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या, त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.