The Kerala Story सिनेमातून डिलीट करण्यात आलेले सीन अखेर समोर; अदा शर्मा म्हणाली…
'द केरळ स्टोरी' सिनेमातून डिलीट करण्यात आलेल्या सीन्सची अदा शर्माने दाखवली एक झलक; सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमा लवकरच २०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगत आहे. सर्वच स्तरातून अदा शर्मा हिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात येत आहे. भारतासोबतच जगातील ४० पेक्षा अधिक देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी सिनेमा बॅन करण्यात आलाय. अशात पश्चिम बंगाल याठिकाणी सिनेमावर घालण्यात आलेला बॅन हटवण्यात आला आहे. अशात येत्या काळात सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला CBFC ने ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी दर्शकांचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील १० दृश्यांवर कात्री फिरवली आहे. आता अदा शर्माने इन्स्टाग्रामवर सिनेमातील डिलीट केलेल्या दृश्यांची झलक दाखवली आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
अदा शर्मा हिने इन्स्टाग्रामवर चार फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटो ‘द केरळ स्टोरी’चा आहे. ज्यावर दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली होती. फोटोमध्ये शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) तिच्या पतीसोबत (विजय कृष्णा) उभी असलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना अदाने लिहिले की, ती बाहेरून गंभीर दिसत असली तरी आतून हसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये अदा शर्मा निर्माते आशिन ए. शाह यांच्यासोबत परदेशातील सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता. महत्त्वाचं म्हणजे जर्मनीमध्ये सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. शेवटच्या फोटोत अदा शर्मा एका म्हशीसोबत दिसत आहे. म्हशीचे नाव मीनाक्षी आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली, ती आणि मीनाक्षी यूकेमध्ये सिनेमाच्या रिलीजबद्दल खूप उत्सुक आहेत.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा भारतात ५ मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा लव्ह जिहाद, धर्मांतर आणि दहशतवादी संघटना ISIS वर आधारलेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटी क्लबच्या यादीत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा सिनेमा 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा करमुक्तही करण्यात आला आहे.