अखेर सुशांतच्या घरात राहायला गेली ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री; म्हणाली “या जागेतून मला..”

काही रिपोर्ट्सनुसार, अदाने सुशांतचं हे घर 4.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतलं आहे. हे दोन मजली घर 3600 चौरस फुटांचं आहे. सुशांतच्या निधनानंतर या घरात राहायला कोणीच तयार होत नव्हतं. अखेर अदाने हे घर पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलं आहे.

अखेर सुशांतच्या घरात राहायला गेली 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री; म्हणाली या जागेतून मला..
अभिनेत्री अदा शर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 9:24 AM

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील घरात राहायला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. अखेर या चर्चांवर अदाने मौन सोडलं असून चार महिन्यांपूर्वीच सुशांतच्या घरी राहायला गेल्याचं तिने सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने नव्या घरात राहण्याचा अनुभव सांगितला. मुंबईतील वांद्रे परिसरातील माँट ब्लँक अपार्टमेंट्समध्ये सुशांतचं घर आहे. सुशांतच्या निधनानंतर या घरात राहायला कोणीच तयार नव्हतं. अखेर अदा शर्मा या घरात शिफ्ट झाली आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याचाही खुलासा केला की सुशांतच्या घरात राहायला जाण्यापासून अनेकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला होता.

याविषयी अदा म्हणाली, “मी चार महिन्यांपूर्वीच या फ्लॅटमध्ये राहायला आले. पण माझ्या प्रोजेक्ट्सचं प्रमोशन, ‘बस्तर’चं शूटिंग आणि ‘द केरळ स्टोरी’चं ओटीटी प्रदर्शन या सर्व गोष्टींमध्ये मी व्यग्र होते. यातून थोडा मोकळा वेळ मिळताच मी मथुरेतील हत्ती अभयारण्यात काही वेळ घालवला. अखेर स्वत:साठी थोडा वेळ काढल्यानंतर मी या नव्या घरात रुळली आहे, असं म्हणायला हरकत नाही.”

हे सुद्धा वाचा

“मी वांद्रेमधील पाली हिल इथल्या माझ्या घरात लहानपणापासून राहिले आहे. दुसऱ्या घरात राहायला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. प्रत्येक जागेतील ‘वाइब्स’च्या बाबतीत मी खूप संवेदनशील आहे आणि मला या जागेतून सकारात्मक वाइब्स मिळतात. केरळ आणि मुंबईतील माझ्या घराच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत. आमच्या घराजवळ विविध पक्षी आणि खारूताई यायची. त्यामुळे मला असं घर हवं होतं, जिथून बाहेरचं दृश्य खूप सुंदर दिसेल आणि जिथे पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठीही जागा असेल”, असं अदाने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रे इथल्या या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याच घरात राहण्याबद्दल अनेकजण साशंक होते. म्हणूनच बरीच वर्षे या घरात राहायला कोणी तयार होत नव्हतं. त्यामुळे अदा शर्माने हे घर भाडेतत्त्वावर घेतल्याचं कळताच त्याची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिलासुद्धा या घरात राहण्यापासून रोखलं होतं. मात्र त्या कोणाचंही न ऐकता स्वत:चं मन काय म्हणतंय, त्यावरून निर्णय घेतल्याचं अदाने स्पष्ट केलं. अदाने पुढील पाच वर्षांसाठी हे घर भाडेतत्त्वावर घेतलं आहे.

सुशांतच्या घरात राहण्याचा निर्णय घेण्याबद्दल सांगताना अदाने तिच्या आयुष्यातील इतरही उदाहरणं दिली. अदाने ‘1920’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीलाच भयपट करू नकोस, असा सल्ला अनेकांनी अदाला दिला होता. त्यानंतर ‘द केरळ स्टोरी’सारखा चित्रपट स्वीकारू नकोस, असंही अनेकांनी तिला सांगितलं होतं. पण स्वत:च्या मनाला जे पटतं, तसे निर्णय घेतल्याने काहीच वाईट होत नाही, असं स्पष्ट करत अदाने इतरांना चुकीचं ठरवलं.

अदाने सुशांतचं घर तिच्या आवडीनुसार पुन्हा डेकोरेट केलं आहे. संपूर्ण घराला तिने पांढरा रंग दिला आहे. खालच्या मजल्यावर मंदिर, वरच्या मजल्यावरील एक रुम म्युझिकसाठी आणि एक रुम डान्ससाठी डिझाइन केलं आहे. त्याचप्रमाणे टेरेसवर तिने छोटंसं गार्डन बनवलं आहे. घरात फारसं फर्निचर आवडत नसल्याने जमिनीवरच जेवण आणि झोपत असल्याचं तिने सांगितलं.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.