Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | “हा चित्रपट द्वेष पसरवतो पण..”; ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माच्या वक्तव्याची चर्चा

काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलंय. अशा नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल अदा पुढे म्हणाली, "मी हे मान्य करते की आमचा चित्रपट द्वेष पसरवतो, पण.."

The Kerala Story | हा चित्रपट द्वेष पसरवतो पण..; 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माच्या वक्तव्याची चर्चा
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:07 PM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या यशाच्या शिखरावर आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अदा शर्मा ही बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींवर केंद्रीत चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी सेलिब्रिटी ठरली आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यात अदासोबतच सोनिया बलानी, योगिता बहानी आणि सिद्धी इदनानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अदा शर्माने 2008 मध्ये बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. मात्र ‘द केरळ स्टोरी’मुळे ती आता प्रकाशझोतात आली आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ती ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी या इंडस्ट्रीतून नाही. त्यामुळे जेव्हाकधी मी एखादी ऑफर स्वीकारायचे, तेव्हा तो माझा शेवटचा चित्रपट असेल असा विचार करायचे. मला स्वत:वरच शंका असायची. कोणी माझ्या कामावर विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मला पडायचा. पण आता खूप चांगलं वाटतंय. इंडस्ट्रीबाहेरून आलेली एक मुलगी असं काही करू शकेल, याचा कोणी विचार केला असेल. मला अशा अनेक कलाकारांचे मेसेज आले की, तुझ्यामुळे आम्हालासुद्धा सकारात्मकता मिळाली आहे.”

काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलंय. अशा नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल अदा पुढे म्हणाली, “मी हे मान्य करते की आमचा चित्रपट द्वेष पसरवतो, पण तो दहशतवादाविरोधात द्वेष पसरवतो. प्रेमाच्या नावाखाली एखाद्याची फसवणूक करणे आणि अत्याचार करणे हे लज्जास्पद आहे. मला त्या गोष्टीचा खूप राग आहे. हा चित्रपट दहशतवाद विरुद्ध माणुसकीचा आहे. जर या चित्रपटामुळे कोणाला समस्या असेल तर ते ISIS ला असायला पाहिजे. त्यामुळे इतर लोकांची विविध मतं असली तरी मला फरक पडत नाही. पण चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबद्दल आधीच मत बनवू नका.”

हे सुद्धा वाचा

“एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मला ती संधी मिळाली, यासाठी मी कृतज्ञ आहे. अशा संधीसाठी मला ‘ओम शांती ओम’मधल्या शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल की काय, असा विचार मी करायचे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली, त्यासाठी मी खूप खुश आहे”, असंही ही याआधीच्या एका मुलाखतीत म्हणाली होती.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.