प्रसिद्ध रॅपरने ऑफिस स्टाफला दाखवले एक्स वाइफचे इंटिमेट फोटो; प्रकरणाची होणार चौकशी
स्टाफ मेंबरला दाखवले अश्लील व्हिडीओ, पूर्व-पत्नीचे खासगी फोटो; निनावी पत्राद्वारे केले गंभीर आरोप
अमेरिका: प्रसिद्ध हॉलिवूड स्टार किम कर्दाशियांचा पूर्वाश्रमीचा पती आणि रॅपर कान्ये वेस्ट अडचणीत सापडला आहे. स्पोर्ट्सवेअर कंपनी ‘एडीडास’ने (Adidas) त्याच्याविरोधात चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कान्येविरोधातील शोषणाच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कान्येनं कंपनीच्या मिटींगदरम्यान स्टाफला अडल्ट फिल्म आणि पूर्वाश्रमीची पत्नी किम कर्दाशियांचे न्यूड फोटो दाखवल्याचा आरोप आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कान्ये वेस्ट हा रॅपरसोबतच फॅशन डिझायनरसुद्धा आहे. एडीडास या प्रसिद्ध कंपनीसोबत त्याने 1.5 अब्ज डॉलर्सची पार्टनरशिप केली होती. कान्येनं डिझाइन केलेले स्पोर्ट्सवेअर हे Yeezy x Adidas नावाने विकले जात होते. मात्र कान्येच्या ट्विट स्कँडलनंतर कंपनीने या पार्टनरशिपला संपवण्याचं जाहीर केलं. आता एडीडासमधल्या एका स्टाफ मेंबरने निनावी पत्र पाठवत कान्ये वेस्टवर गंभीर आरोप केले आहेत.
कान्ये वेस्टनं स्टाफला अडल्ट कंटेंट दाखवण्याचा आरोप या पत्रातून संबंधित स्टाफ मेंबरने केला आहे. इतकंच नाही तर जॉब इंटरव्ह्यूदरम्यान तो लोकांना एक्स-वाइफ किम कर्दाशियांचे इंटिमेट फोटोसुद्धा दाखवत होता, असंही त्यात म्हटलंय.
एडीडासच्या मॅनेजमेंटने नैतिकतेचा विचार न करता वेस्टच्या या विचित्र आणि त्रासदायक व्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याचंही पत्रात लिहिलं आहे. बऱ्याच वर्षांपासून चालू असलेल्या या अश्लील कृत्यांपासून, त्रासापासून कंपनीने कर्मचाऱ्यांना वाचवलं नाही, असाही आरोप त्यात करण्यात आला आहे.
View this post on Instagram
कंपनीचा मोठा निर्णय
या निनावी पत्रातून केलेले आरोप खरे आहेत की खोटे हे अद्याप स्पष्ट झालं नाही असं एडीडासने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलंय. मात्र या आरोपांना गंभीरतेने घेत त्याची चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आहे.
2017 मध्ये कान्ये वेस्ट हा एडीडासच्या डिझाइन टीममधल्या एका महिला स्टाफ मेंबरवर वाईट पद्धतीने ओरडला होता, असं म्हटलं जातं. स्टाफ मेंबरने बनवलेले Yeezy स्नीकर्स स्टँडर्डचे नाहीत, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानंतर महिलेसाठी त्याने अपशब्दही वापरले होते.
कान्ये वेस्टचं वादग्रस्त ट्विट
ऑक्टोबर 2022 मध्ये कान्ये वेस्टनं एका वादग्रस्ट ट्विटमुळे सर्वकाही गमावलं होतं. कान्येनं यहुदींविरोधात हे ट्विट केलं होतं. या ट्विटवरून मोठा हंगामा झाला होता. सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं होतं. एडीडास, गॅप, वोग यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी कान्येसोबतची पार्टनरशिप संपवली होती. यामुळे त्याचं 16 कोटींचं नुकसान झालं होतं.