Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने माझे अश्लील व्हिडिओ बनवले आणि…’, राखी सावंत हिच्याकडून Adil Khan याच्यावर गंभीर आरोप

पती आदिल खान विरोधात राखी सावंत हिने केला आणखी एक मोठा खुलासा, 'माझे अश्लील व्हिडिओ बनवले आणि...' , आदिलच्या अडचणींमध्ये मोठी वाढ... याप्रकरणी आता पुढे काय होणार?

'त्याने माझे अश्लील व्हिडिओ बनवले आणि...', राखी सावंत हिच्याकडून Adil Khan याच्यावर गंभीर आरोप
'त्याने माझे अश्लील व्हिडिओ बनवले आणि...', राखी सावंत हिच्याकडून Adil Khan याच्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 9:34 AM

Rakhi Sawant Adil Khan Controversy : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या वैवैहिक आयुष्यातील अडचणी काही केल्या संपत नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर मारहाण आणि फसवणूकीचे आरोप केले होते. राखीने आदिल विरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदीलला पोलिसांनी अटक केली आहे. एवढंच नाही तर, न्याय मिळावा यासाठी राखी हिने न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत राखी हिने आदिलवर आणखी गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे आदिल याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुलाखतीत राखी सावंत म्हणाली, ‘आदिल याने माझे अश्लील व्हिडीओ बनवून विकले आहेत. माझी केस सायबक्राईम डिपार्टमेंटकडे आहे. आदिल गर्लफ्रेंड तनू हिच्यासोबत तिसरं लग्न करण्याच्या विचारात आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र राखी आणि आदिल यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. (Rakhi Sawant Adil Khan Controversy)

१.५ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप गुरुवारी कोर्टात पोहचलेली राखी सावंत म्हणाली, ‘मी कोर्टामध्ये माझी बाजू मांडली आहे. आदिलला जामिन मिळालेला नाही. माझी वैद्यकिय चाचणी झाली आहे. ओशिवारा पोलीस स्थानकात मी पुरावे देखील जमा केलं आहेत. आदिलने मला त्रास दिला माझी फसवणूक केली. त्याला जामिन नाहीच मिळाला पाहिजे. मी पोलिसांना माझे बँक स्टेटमेंट देखील दिले आहेत…’ (Who is Adil with Rakhi Sawant?)

‘आदिल याने माझ्याकडून ओटीपी घेतले होते आणि माझे पैसे देखील चोरले आहेत. त्याने माझा विश्वास मोडला आहे.’ असं देखील राखी सावंत म्हणाली. याप्रकरणी राखी हिचे वकील म्हणाले, ‘आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. ज्यामुळे आदिल याला जामिन मिळणार आहे. १.५ कोटी रुपयांची फसवणूक प्रचंड मोठा गुन्हा आहे…’ वकिलांच्या वक्तव्यानंतर याप्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Rakhi Sawant lifestyle)

एवढंच नाही तर, राखी सावंत हिने आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरलं आहे. मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी राखीने आदिलला १० लाखांचा चेक दिला होता. त्या पैश्यांच्या मदतीने राखी हिच्या आईची शस्त्रक्रिया होणार होती. पण ते पैसे आदिलने आईच्या उरचारांसाठी खर्च केले नाही. ज्यामुळे आईचा मृत्यू झाला असं देखील राखी सावंत म्हणाली.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...