Adipurush | प्रदर्शनाआधीच ‘आदिपुरुष’च्या तिकिटांची जोरदार विक्री; ‘पठाण’, ‘RRR’ला तगडी टक्कर

आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचणार, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. कोरोना महामारीनंतर पठाण आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. 

Adipurush | प्रदर्शनाआधीच 'आदिपुरुष'च्या तिकिटांची जोरदार विक्री; 'पठाण', 'RRR'ला तगडी टक्कर
Adipurush final trailer Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 8:00 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून शनिवारी रात्रीपासून ॲडव्हान्स तिकिट बुकिंगला सुरुवात झाली. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीसमध्ये जवळपास 18 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर रविवारी रात्रीपर्यंत हा आकडा जवळपास 23 ते 25 हजारांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.

अवघ्या काही तासांत हजारो तिकिटांची विक्री

पीव्हीआरमध्ये 8800, आयनॉक्समध्ये 6100 तर सिनेपोलीसमध्ये 3500 तिकिटं विकली गेली आहेत. केवळ सहा तासांच्या अंतरात झालेली ही बुकिंग उल्लेखनीय आहे. कारण रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 7800 तिकिटं विकली गेली होती. केवळ प्रेक्षकच नाही तर काही सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाच्या तिकिटांची बुकिंग करत आहेत. ‘कार्तिकेय 2’ या गाजलेल्या तेलुगू चित्रपटाचा निर्माता अभिषेक अगरवालने चित्रपटाची दहा हजार तिकिटं दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय अभिनेता रणबीर कपूरनेही आदिपुरुष चित्रपटाची दहा हजार तिकिटं विकत घेणार असल्याचं जाहीर केलंय.

रामायणावर आधारित कथा

आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचणार, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. कोरोना महामारीनंतर पठाण आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने लंकेश रावणाची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं.

हे सुद्धा वाचा

आदिपुरुष हा चित्रपट आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर ही तारीख 12 जानेवारी 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अखेर येत्या 16 जून रोजी 3D मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.