Adipurush : सीतेबद्दलच्या ‘त्या’ डायलॉगमुळे अखेर टी-सीरिजला मागावी लागली परदेशात माफी

काठमांडूमधील 17 थिएटर्समध्ये सध्या प्रदर्शित होत असलेल्या सर्व हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत. “केएमसीने जारी केलेल्या सूचनेनुसार सोमवारपासून काठमांडूमधील सर्व थिएटरमध्ये भारतीय चित्रपट दाखवणं बंद करतील”, असं केएमसीचे प्रवक्ते नवीन मानंधर यांनी सांगितलं.

Adipurush : सीतेबद्दलच्या 'त्या' डायलॉगमुळे अखेर टी-सीरिजला मागावी लागली परदेशात माफी
AdipurushImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:57 AM

काठमांडू : ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील एका डायलॉगमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर काठमांडूमध्ये बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर ‘आदिपुरुष’च्या निषेधार्थ काठमांडूमध्ये इतरही हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर 19 जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अखेर ‘आदिपुरुष’चे निर्माते टी-सीरिजकडून महापौरांची माफी मागण्यात आली आहे. ‘नेपाळमधील जनतेच्या भावना आम्ही दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी मागतो’, असं पत्र टी-सीरिजकडून देण्यात आलं आहे.

‘आम्ही जाणूनबुजून लोकांच्या भावना दुखावल्या नाहीत. चित्रपटातील प्रभासच्या डायलॉगमध्ये सीता मातेच्या जन्मभूमीचा कुठेच उल्लेख नाही. भारतातील सर्वसामान्य महिलांच्या आदर आणि सन्मानाविषयीचा तो डायलॉग आहे. भारतीय म्हणून सर्व जगातील महिलांचा आदर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की एका कलेच्या रुपात तुम्ही हा चित्रपट पहा आणि त्यामागे असलेल्या आमच्या उद्देशाला पाठिंबा द्या’, असं माफीनाम्यात लिहिण्यात आलं आहे.

नेमका डायलॉग काय?

सीताहरणनंतर प्रभू श्रीराम जेव्हा रावणाशी युद्ध करण्यास सज्ज होतात, तेव्हा युद्धाच्या आधी वानरसेनेला उद्देशून ते म्हणतात, “आज मेरे लिए मत लढना, उस दिन के लिए लढना जब भारत की किसी बेटी पर हात डालने से पहले दुराचारी तुम्हारा पौरुष याद करते काप उठेगा.” या डायलॉगमध्ये कुठेत सीता मातेचा उल्लेख नसल्याचं टी-सीरिजने स्पष्ट केलं आहे.

हे सुद्धा वाचा

काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी

काठमांडूमधील 17 थिएटर्समध्ये सध्या प्रदर्शित होत असलेल्या सर्व हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत. “केएमसीने जारी केलेल्या सूचनेनुसार सोमवारपासून काठमांडूमधील सर्व थिएटरमध्ये भारतीय चित्रपट दाखवणं बंद करतील”, असं केएमसीचे प्रवक्ते नवीन मानंधर यांनी सांगितलं. “आम्ही काठमांडूमधील थिएटरमालकांशी सहकार्यासाठी आधीच बोललो आहोत आणि त्यांनी स्वेच्छेने सोमवारपासून काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यास सहमती दर्शविली आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रामायणावर आधारित आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने शेषची (लक्ष्मण) भूमिका साकारली आहे. एकीकडे नेपाळमध्ये सीतेबद्दलच्या संवादावरून वाद सुरू असताना भारतातही या चित्रपटाला जोरदार विरोध केला जातोय.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.