‘आदिपुरुष’ला तब्बल इतक्या कोटींचा फटका; ओम राऊत करणार मोठे बदल

'आदिपुरुष'चा वाद निर्मात्यांना पडला महागात; प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार?

'आदिपुरुष'ला तब्बल इतक्या कोटींचा फटका; ओम राऊत करणार मोठे बदल
Prabhas in AdipurushImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 1:23 PM

मुंबई- राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक ओम राऊत सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या टीझरवरून सोशल मीडियावर खूप मोठा वाद निर्माण झाला. टीझरमधील रावणाच्या लूकवर अनेकांनी आक्षेप घेतला. तर काहींनी व्हिएफएक्सवरून टीका करण्यास सुरुवात केली. आता याच चित्रपटासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

आदिपुरुष या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्हीएफएक्सवरून एवढा मोठा वाद झाला, त्यात महत्त्वपूर्ण बदल केले जाणार असल्याचं समजतंय. निर्मात्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिएफएक्समधील बदलासाठी निर्मात्यांना तब्बल 100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. सध्या सर्वत्र होणारा विरोध पाहता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तोटा सहन करावा लागू नये, यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचचलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटावर नव्याने केला जाणारा खर्च पाहता आता ‘आदिपुरुष’चा बजेट 600 कोटींच्या घरात जात आहे. यामध्ये प्रभास, कृती सनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र ओम राऊतला चित्रपटात बरेच बदल करायचे असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि कृती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. मात्र त्याच्या याच भूमिकेवरून जोरदार हंगामा झाला. ओम राऊतच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली गेली.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.