Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | ‘आदिपुरुष’च्या नव्या ट्रेलरमध्ये ‘लंकेश’च्या भूमिकेतील सैफने वेधलं लक्ष; पुन्हा झाली ‘ही’ चूक

मंगळवार प्रभास आणि चित्रपटाच्या टीमने तिरुपतीमध्ये श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ट्रेलरचा मोठा कार्यक्रम त्याठिकाणी पार पडला. यावेळी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

Adipurush | 'आदिपुरुष'च्या नव्या ट्रेलरमध्ये 'लंकेश'च्या भूमिकेतील सैफने वेधलं लक्ष; पुन्हा झाली 'ही' चूक
Adipurush final trailer Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 9:19 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 16 जून रोजी थिएटरमध्ये 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मंगळवारी आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नव्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. रामायणाची कथा एका नव्या रुपातून या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सीताहरण आणि लंकेशसोबत प्रभू श्रीराम यांच्या युद्धाची झलक पहायला मिळते. याआधी प्रदर्शित केलेल्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांमध्ये सैफ अली खानचा लूक फारसा दाखवण्यात आला नव्हता. मात्र या ट्रेलरमध्ये त्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

या ट्रेलरमधील सुरुवातीचा भाग व्हीएफएक्सच्या (VFX) दृष्टीने दमदार वाटतो. मात्र नंतर नंतर त्यातील काही सीन्स खटकू लागतात. व्हिज्युअल इफेक्ट्सची क्वालिटी हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आता थिएटरमध्ये या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

मंगळवार प्रभास आणि चित्रपटाच्या टीमने तिरुपतीमध्ये श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ट्रेलरचा मोठा कार्यक्रम त्याठिकाणी पार पडला. यावेळी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. “मला या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी ओम राऊत यांचे आभार मानतो. आम्ही हा चित्रपट खूप प्रेम आणि आदराने बनवला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी आशा आहे”, अशी प्रतिक्रिया प्रभासने यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट रामलीला करणाऱ्या कलाकारांना समर्पित केला. “रामलीलामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक कलाकाराला मी हा चित्रपट समर्पित करतो. रामायणाची कथा वर्षानुवर्षांपासून सांगितली जात आहे. ही जणू एक बस आहे आणि आता त्या बसमध्ये आम्ही प्रवास करत आहोत. तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आम्ही उचलली आहे. रामलीलाचा हा प्रवास असाच सुरू राहील”, असं ते म्हणाले.

आदिपुरुषच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक सीट ही हनुमानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या सीटचं तिकिट कोणालाच विकलं जाणार नाही. “रामायणाची कथा जिथे जिथे सांगितली जाते, तिथे हनुमान असतात असा आमचा विश्वास आहे. या विश्वासामुळे आम्ही थिएटरमधील एक जागा ही हनुमानासाठी राखीव ठेवणार आहोत. त्या सीटचं तिकिट कोणालाच विकलं जाणार नाही. रामाच्या सर्वांत मोठ्या भक्तासाठी आम्ही हे पाऊल उचलतोय”, असं टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.