Adipurush | ‘एका गाण्याने सर्वकाही बदललं’; ‘आदिपुरुष’चा नवा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे!

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरवरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता.

Adipurush | 'एका गाण्याने सर्वकाही बदललं'; 'आदिपुरुष'चा नवा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे!
AdipurushImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 9:17 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्यावरून कोणता ना कोणता वाद सुरूच आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहून नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रामाणय या पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चा लिरिकल मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. काही सेकंदांच्या या व्हिडीओने चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रभासचा हा नवीन मोशन पोस्टर चाहत्यांना खूपच आवडला आहे.

‘तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे। दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे। तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा, मंगल हमारा। मंत्रों से बढ़के तेरा नाम, जय श्री राम राजा राम’, या ओळी व्हिडीओत ऐकायला मिळत आहेत. या ओळींसोबतच प्रभासचा राम अवतार या मोशन पोस्टरमध्ये दिसू लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याची भावना अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

‘व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आले’ असं एकाने लिहिलं. तर ‘सर्व नकारात्मक भावना आता सकारात्मकतेत बदलल्या आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘जय श्रीराम या एका गाण्यामुळे चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरवरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.