Kriti Sanon: सार्वजनिक ठिकाणी आदिपुरुषच्या ‘जानकी’ने असं केलं तरी काय? ज्याचा अनुभव सांगत अभिनेत्री म्हणाली…
सध्या 'आदिपुरुष' सिनेमामु्ळे चर्चेत असलेल्या क्रितीने सांगितला सार्वजनिक ठिकाणी केलेल्या 'त्या' गोष्टीचा अनुभव.. एक मुलाखतीत अभिनेत्रीकडून मोठा खुलासा..

मुंबई | अभिनेत्री क्रिती सनॉन कायम तिच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण क्रिती सध्या ‘आदिपुरुष’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा आहे. दरम्यान, क्रितीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ‘आदिपूरुष’ सिनेमापूर्वी देखील क्रितीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ज्यामुळे क्रितीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सांगायचं झालं तर, ‘आदिपूरुष’ च्या जानकीने सार्वजनिक ठिकाणी ओढली सिगारेट आहे. स्मोकिंगचा अनुभव खुद्द क्रितीने एका मुलाखतीत सांगितला आहे.
‘आदिपूरुष’ सिनेमात आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या क्रितीने अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव स्टारर ‘बरेली की बर्फी’ सिनेमात क्रिती बिनधास्त असणाऱ्या बिट्टीची भूमिका साकारली होती. ‘बरेली की बर्फी’ सिनेमात अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसली..
क्रितीचा हा अंदाज पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. क्रितीला सिगारेट प्यायची सवय आहे.. असं देखील अनेकांना वाटू लागलं होतं. एका सीननंतर अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. तर एका मुलाखतीत अभिनेत्री स्मोकिंगबद्दल विचारण्यात देखील आलं..
स्मोकिंगचा अनुभव शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी धूम्रपान करत नाही. मी धूम्रपानाच्या विरोधात आहे. पण सिनेमासाठी मला स्मोक करावं लागलं.. पहिल्यांदा स्मोक केलं होतं पण मला ते आडलं नाही. मला फक्त माउथ फॅग करायचं नव्हतं, कारण जे स्मोकिंग करतात त्यांना क्षणार्धात समजलं असतं की मी धूम्रपान करत नाही.’
क्रिती कायम तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असते. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ सिनेमातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘मीमी’ सिनेमामुळे देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.. आता क्रिती ‘आदिपुरुष’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे.
सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. आता सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सोशल मीडियावर देखील क्रिती कायम सक्रिय असते. नव्या सिनेमाबद्दल महत्त्वाची माहिती अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.